Sugarcane Fire Issue : ऊस जळण्याच्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले

Farmer Issue : उसाला आग लागण्याची ही तिसरी, तर महिनाभरातील चौथी घटना आहे. त्यामुळे काठापूर बुद्रुकमध्ये वीज तारांमुळे ऊस जळण्याच्या वाढलेल्या घटनांमुळे ऊस उत्पादक धास्तावले आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

Ambegaon News : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे शेतावरून गेलेल्या विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत सोमवारी (ता. २८) पांडुरंग करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळाला. पाच ते सहा दिवसांत याच परिसरात उसाला आग लागण्याची ही तिसरी, तर महिनाभरातील चौथी घटना आहे. त्यामुळे काठापूर बुद्रुकमध्ये वीज तारांमुळे ऊस जळण्याच्या वाढलेल्या घटनांमुळे ऊस उत्पादक धास्तावले आहेत.

Sugarcane
Sugarcane Harvesting : जळगावात ऊस तोडणी लांबणीवर

वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात गावातील सर्वच वीज वाहक तारा आणि खांबांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी. अन्यथा, मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. करंडे यांनी गट नंबर ८९ मध्ये ५० गुंठे यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. त्याला शॉकसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे ऊस जळून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Sugarcane
Sugarcane Fire News : उरळगावात पाच एकर ऊस अज्ञाताने जाळला

अजून एक महिनाभर कारखाने सुरू होणार नाही. त्यामुळे हा ऊस तोडून ही जाणार नाही. परिणामी, एक महिन्यात ऊस वाळून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. काठापुरात असणारे खांब व त्यामधील जास्त अंतर जास्त आहे. त्यामुळे तारांना झोळ पडून दुर्घटना होत असतात. परंतु मागील पाचच दिवसांत तिसरी घटना झाल्याने शेतकरी पांडुरंग करंडे व नवनाथ करंडे यांनी संबंधित विभागाने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली.

वीज कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा

काठापूर बुद्रुक बारमाही बागायती गाव आहे. ऊस जळण्याच्या घटनांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वीजवितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात विजेच्या तारांची उंची वाढवावी. ज्या ठिकाणी दोन खांबांतील अंतर जास्त आहे, तेथे नवीन खांब बसवावेत. जर वीज वितरण कंपनीने यावर उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या वतीने वीज कंपनीवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com