Sugarcane FRP Pending: सोलापूर जिल्ह्यात थकली ५६२ कोटींची ऊसबिले

Farmers Protest Solapur: सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम संपला असला, तरी अनेक साखर कारखान्यांकडून ५६२ कोटींची एफआरपी थकली आहे. १७ मार्चपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम आटोपला असला, तरीही अनेक कारखान्यांकडून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांकडे फेब्रुवारीअखेर ५६२.२२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे.

कारखान्यात गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना १५ दिवसांत देण्याची कायद्यात तरतूद आहे. या वर्षी जिल्ह्यात १५ फेब्रुवारीअखेर ९८ लाख ९६ हजार ४२६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. १०.२५ टक्के पायाभूत साखर उताऱ्याप्रमाणे तोडणी वाहतूक वजा जाता या उसाचे फेब्रुवारीअखेर देय असलेल्या रकमेपैकी दोन हजार २५ कोटी रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत.

Sugarcane
Sugarcane Crushing Season : नांदेड विभागातील दहा कारखान्यांचा पट्टा पडला

तरीही पायाभूत साखर उताऱ्यानुसार एफआरपीचे ५६२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे अडकले आहेत. हंगाम सुरू होताना ऊस मिळविण्यासाठी जाहीर केलेला ऊसदर अथवा पहिल्या हप्त्याप्रमाणे ही रक्कम ६५० कोटींच्या घरात जाते. फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाची बिले विचारात घेतल्यास थकीत ऊसबिलाचा आकडा मोठा आहे.

जिल्ह्यातील पांडुरंग साखर कारखान्याने पहिला हप्ता दोन हजार ७०० रुपये तर विठ्ठलराव शिंदे कारखान्यांच्या दोन्ही युनिटने दोन हजार ८०० रुपये जाहीर केला होता. जिल्ह्यातील या तीनच कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण ऊसबिले दिली आहेत. बाकी कारखान्यांकडील थकबाकीचा आकडा तसाच आहे.

Sugarcane
Sugarcane Cultivation : शाश्‍वत उत्पादन, हमीने पैसे देणारे उसाचे एकमेव पीक
साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार ऊसबिले मिळालीच पाहिजेत, यासाठी रयत क्रांती पक्ष बांधील राहील. कारखाने ऊसदर जाहीर करत ऊसतोड करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात लढा उभारावा लागेल.
प्रा.सुहास पाटील, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती पक्ष
जिल्ह्यातील थकीत ऊसबिलाची रक्कम एक हजार कोटीच्या घरात आहे. साखर सहसंचालकांना त्याबाबत निवेदने दिल्यावर त्यांनी साखर कारखान्यांना केवळ नोटीस काढण्याचे काम केले. प्रत्यक्षात कारवाई मात्र काहीच करत नाही. ऊसबिलांसाठी १७ मार्चपासून सोलापुरात साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत.
विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com