Sugar Shortage: सणासुदीच्या काळात देशात साखरेची टंचाई निर्माण होण्याची चार महिन्यांपूर्वीच स्पष्ट शक्यता असतानाही मोदी सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत. नफेखोर आणि काळाबाजार करणाऱ्यांना जनतेची लूट करण्याची संधी देत सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा होऊ दिला, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार रणदीपसिंह सुरजेवाला यांनी गुरुवारी (ता. २७) केला..देशात साखरेचा दर प्रति किलो ४५ रुपयांवरून ७० ते ७५ रुपयांपर्यंत वाढला आहे. जनतेची लूट करण्यासाठी मोदी सरकारचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. लोकांना मधुमेहापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर महाग केली आणि ऊस पेट्रोलमध्ये टाकला, असे भाजपचे नेते सांगत असल्याचेही ते म्हणाले. नोव्हेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत ई-२० इंधनासाठी ३२ टक्के ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आला. .Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती.हाच ऊस साखर उत्पादनासाठी वापरला असता तर साखरेचे दर वाढले नसते, असा दावा सुरजेवाला यांनी केला. सध्या ज्यांच्याकडे साखरेचा साठा आहे, त्यांना कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता किलोमागे ३० रुपयांचा फायदा होणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात १२० लाख टन साखरेची विक्री अपेक्षित असून, ग्राहकांना किलोमागे ३० रुपये अतिरिक्त मोजावे लागल्यास ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल, असे त्यांनी सांगितले..Sugar Prices: सरकारच्या उपाययोजनेनंतरही साखरेचे किरकोळ दर वाढलेलेच, नेमकं कारण काय?.२०२५-२६ च्या सुरुवातीला देशात साखरेचा शिल्लक साठा ५० लाख टन होता. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा ३० लाख टनांनी कमी होता. याच वर्षात देशात ३४३ लाख टन साखर उत्पादन होईल, असा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र प्रत्यक्षात २७५ लाख टन उत्पादन झाल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) ३० एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते, असे सुरजेवाला यांनी सांगितले..देशात दरमहा सरासरी २४ लाख टन साखरेचा वापर होतो. ऑगस्ट ते नोव्हेंबर या सणासुदीच्या चार महिन्यांत हा वापर सरासरी ३० लाख टनांपर्यंत वाढतो. त्यामुळे या कालावधीत सुमारे १२० लाख टन साखरेची आवश्यकता भासणार आहे. टंचाईची शक्यता स्पष्ट असतानाही केंद्र सरकारने एप्रिलपासून चार महिन्यांत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप त्यांनी केला..दर आणखी वाढण्याची शक्यता : सुरजेवाला२० ऑगस्ट रोजी ब्राझीलमधून १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्राझीलमधून सागरी मार्गाने साखर भारतात पोहोचण्यासाठी ४५ ते ५५ दिवस लागतील. त्यानंतर साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील. त्यामुळे ही साखर सणासुदीच्या काळात उपलब्ध होणार नाही. परिणामी सध्या प्रतिकिलो ७० ते ७५ रुपये असलेले साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सुरजेवाला म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.