Sugarcane Crushing : सांगलीतील कारखान्यांनी ऊस गाळपात घेतला वेग

Sugarcane : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाने आता वेग घेतला आहे. २५ दिवसांत १५ लाख ६८ हजार २५४ टन उसाचे गाळप करून १४ लाख ४६ हजार ८१९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangali News : सांगली ः जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाने आता वेग घेतला आहे. २५ दिवसांत १५ लाख ६८ हजार २५४ टन उसाचे गाळप करून १४ लाख ४६ हजार ८१९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कडाक्याच्या थंडीने हळूहळू साखर उतारा वाढत आहे.

हंगामाच्या सुरुवातीपासून जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्यांत चढाओढ सुरू आहे. एक दोन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची घोषणा केलेली नाही.

हंगामाच्या सुरुवातीला कारखान्यांनी जास्तीत जास्त गाळपावर भर दिला आहे. कुंडलच्या क्रांती कारखान्याने गाळपात आघाडी घेतली आहे. क्रांती कारखान्याने २ लाख १६ हजार ४५० टन इतके गाळप केले आहे. साखर उताऱ्यात हुतात्मा साखर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपास गती घेतली आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : ऊस गाळपात बारामती अॅग्रोची आघाडी

हंगामाच्या सुरुवातीलाच झालेला पाऊस, विधानसभा निवडणुकांमुळे उशिरा सुरू झालेला गाळप हंगाम आता हळूहळू वेग पकडू लागला आहे. रस्त्यालगत असणाऱ्या फडावर सुरुवातीला कोयता पडत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांनी पहिला हप्ता ३७०० रुपयांचा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर सर्व कारखानदारांनी मौन धारण केले आहे. त्यातच जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन ३२००, ३१५० रुपये अशा घोषणा केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा दर मान्य नाही. जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, जिल्हा प्रशासन ऊस दराबाबत बैठक घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजारामबापू व दत्त इंडिया या कारखान्यांनी अनुक्रमे ३२०० व ३१५० अशी दराची घोषणा केली आहे. हुतात्मा, क्रांती, सोनहिरा, विश्वास या कारखान्यांनी अद्याप पहिल्या हप्त्याची घोषणा केलेली नाही. त्यांच्याकडे उत्पादकांचे डोळे लागले आहेत.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले गाळप दृष्टिक्षेप

कारखाना गाळप (टनांत) साखर उत्पादन (क्विंटल) साखर उतारा (टक्के)

दत्त इंडिया (सांगली) १,९१,५१५ १८८०६० १०.३६

राजारामबापू (साखराळे) ६१,५५५* ५७०४० १०.४५

विश्वास (चिखली) ७८,०८० ७९,८०० १०.५८

हुतात्मा (वाळवे) १,००,७१० ९८,४७५ ११.१९

राजारामबापू (वाटेगाव) ६३,९५० ६४,००० १०.९

राजारामबापू, तिपेहळ्ळी (जत) ५७००५ ५३८०० ८.९२

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा (वांगी) २,०४,५५५ १,७०,६६० ८.५३

डॉ. जी. डी. बापू लाड क्रांती (कुंडल) २,१६,४५० २,०९,४६० १०.७६

सर्वोदय (कारंदवाडी) ४१,५१० ३६,९४० १०.६१

मोहनराव शिंदे (आरग) १,०,३४२० १,११,६०० ११.०९

दालमिया (करुंगली) ८०,५१० ८५,९०० ११.१२

यशवंत (नागेवाडी) ४०,३७० ४२,७६५ १०.८२

रायगाव शुगर २५,८२० २२७५० ९.३९

उदगिरी शुगर १.३६.७१३ ९९.१०० ७.५५

सद्‌गुरू (राजेवाडी) ६०,८४१ २९,९६९ ५.२४

श्रीपती शुगर (डफळापूर) १,०५,२५० ११,५०० १०.०२

एकूण १५,६८,२५४ १४,६१,८१९ ९.३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com