Sudhir Mungantiwar Raised Paddy Farmers Issue: धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस न दिल्यावरुन आमदार सुधीर मुनगंटीवार मंगळवारी विधानसभेत संताप व्यक्त केला. धान उत्पादक शेतकरी हा इतर शेतकऱ्यांमधील अतिगरीब असा आहे. तो सर्वात फाटका शेतकरी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत तत्काळ निर्णय जाहीर करा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी अक्षरक्ष: नागरी अन्नपुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांना धारेवर धरले. यावर मंत्री कदम यांनी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक घेऊन यावर्षी बोनस देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे उत्तर दिले. पण त्यांच्याकडून ठोस उत्तर न मिळाल्याने मुनगंटीवार यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरुच ठेवली. .सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच लक्षवेधीतून धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनसचा मुद्दा मांडून सरकारला घरचा आहेर दिला. मागच्या वर्षी धान बोनस देण्यासाठी १,६३० कोटी मजूंर केले. ही रक्कम हेक्टरी २० हजार रुपये दिली. मागच्या वर्षी १,५८६ कोटी ७१ लाख वितरित केले. नागपूर विभाग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री बावनकुळे यांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. येथे ८ लाख ५८ हजार ३७१ हेक्टरवर पेरणी झाली. ७ लाख १६ हजार ३३४ शेतकरी धानाच्या बोनसच्या घोषणेची चातकपेक्षाही वाट पाहात असल्याचे मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले..यावर्षीचा शासन निर्णय (जीआर) जानेवारीमध्ये निघेल. पण १२ जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता होती. सरकारने २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला. २०२३-२४ मध्ये १,३७८ कोटी रुपये दिले, २०२४-२५ मध्ये १,६३० कोटींचे वितरण केले. त्यातील १,५८६ कोटी वितरित झाले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे याबाबत त्वरित कारवाई करावे, असे आदेश असताना जर अन्ननागरी पुरवठा विभाग कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला..मागच्या वर्षी काढलेल्या जीआरमध्ये धानाचा भाव २,३२० रुपये होता. तेव्हा तुम्ही सांगितले की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख असल्याने आम्ही बोनस देत आहोत. पण आता ठोस उत्तर हवे. धानाचा बोनस देण्याचा जीआर दोन दिवसांत निघेल? यावर ठोस उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली..Budget Agriculture Allocation: 'कृषी शिक्षण, संशोधनावरील कपात शेतकऱ्यांच्या मुळावर'.धान उत्पादकांना एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. त्याबदल्यात त्यांना हजार, दोन हजार, पाच हजारांच्या प्रती उत्पन्नही मिळू शकत नाही. आपण दरवर्षी ४४ हजार कोटी रुपये वेतन आयोगासाठी वाढवतो. डीए म्हणून कर्मचाऱ्यांना १० हजार कोटी दरवर्षी वाढवून देतो. आमदारांचा पगार वाढवून देतो. धानाचा बोनस द्यायची वेळ आली की चर्चा, बैठका, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहात का? हे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या बोनसचा निर्णय अपेक्षित आहे. विधानसभेत जेव्हा लक्षवेधी येते तेव्हा पूर्ण तयारी करुन यायचे असते. इथे असे उत्तर अपेक्षित नाही. केवळ बैठक घेऊन सांगू, असे उत्तर देता. हा संविधानाचा अपमान आहे. स्पष्ट उत्तर द्या. तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील?, २५ डिसेंबरपासूनची ही मागणी आहे. चुकीचे आकडे सांगतात, असे मुनगंटीवार यांनी सांगत अन्नपुरवठा मंत्र्यांना फैलावर घेतले..Fodder Subsidy: चाऱ्यासाठी अनुदान देण्याबाबत निर्णय घेऊ, दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांची विधानसभेत माहिती.त्यावर मंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आमचे सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही. बोनस रक्कम योग्य हाती गेली पाहिजे. शेतकऱ्यांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक आहे. काही लोक सात-बारा घेऊन यायचे. एक एजंट पन्नास शेतकऱ्यांची नोंदणी करून बोनस घेऊन जात होते. आता आधार कार्ड सक्तीचे केले. आधार लिंक असलेल्या बँकेत पैसे वितरीत करतो. या हंगामात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेऊन निर्णय घेऊ, असे कदम यांनी सांगितले..धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा फार भयानक- वडेट्टीवारकाँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीशी सहमती दर्शवली. ''तुमच्या बोलण्यातून आम्हाला सकारात्मक वाटत नाही. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार देण्याचा निर्णय घ्या. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा फार भयानक आहे. या वर्षी १,५००, १,६०० रुपयाला उन्हाळी धान घ्यायला कोणी तयार नाही?. इतकी वाईट अवस्था त्यांची झाली आहे. कसली आधारभूत किंमत आम्ही सांगतो?, उत्पादन, खताचा खर्च वाढला आहे. त्यांचे अनुदान काढून घेतले. इतक्या भयानक परिस्थितीत शेतकरी झुंजत आहे. अशा परिस्थितीत जर सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे'', अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.त्याचा बळी घ्यायला तुम्ही निघालात. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या मंत्रिमंडळात हेक्टरी २० हजार बोनस जाहीर करु, असे सांगून टाका. मुनगंटीवार सत्ताधारी पक्षाचे असतानाही तळमळीने शेतकऱ्यांची व्यथा मांडत आहेत. शेतकऱ्यांचा व्यथाचा विचार करा, सकारात्मक उत्तर द्या, असे त्यांनी म्हटले. .Opposition Protest: 'फाईल हलते पैशानं...'; विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन.'प्रक्रिया नेमकी किती दिवसांत पूर्ण होणार?' काँग्रेस नितीन राऊत यांनीही, सरकारकडून ठोस उत्तराची अपेक्षा होती ते मिळू शकले नसल्याने नाराजी व्यक्त केली. विदर्भातील शेतकरी सध्या कर्जाच्या आणि अवकाळी पावसाच्या संकटात अडकला आहे. ही प्रक्रिया नेमकी किती दिवसात पूर्ण होणार? हे सांगावे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील धान शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशावेळी केवळ कागदी आकडेमोड न करता, 'एनडीआरएफ'च्या निकषांबाहेर जाऊन विशेष पॅकेज म्हणून बोनसची रक्कम वाढवून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार का? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. .गुहागरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही कोकणातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला. बोनस देण्याची योजना केवळ विदर्भातील शेतकऱ्यांना लागू आहे की कोकणलाही लागू आहे. कारण कोकण हा भात शेती करणारा प्रांत आहे. ही योजना कोकणसाठीही लागू करणार का? असा प्रश्न जाधव यांना केला. .योगेश कदम काय म्हणाले?त्यावर मंत्री कदम यांनी ही बोनस योजना पूर्ण महाराष्ट्रात लागू असल्याचे स्पष्ट केले. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम २०१३ पासून दरवर्षी देण्यास सुरुवात केली. पणन हंगामातील आकडेवारी पाहिली तर मागच्या तीन वर्षांत २०२२-२३ मध्ये जवळपास ८२३ कोटींचा निधी खर्च केला. २०२३-२४ मध्ये १,३७८ कोटी आणि २०२४-२५ मध्ये १,६२८ कोटी खर्च केला. ही प्रोत्साहनपर रक्कम देताना नोंदणीकृत शेतकऱ्यांना देतो. नोंदणी केली की बोनस देऊन टाकतो, असे कदम यांनी सांगितले. २०२२-२३ मध्ये जवळपास ८२३ कोटी खर्च केला. तर १ कोटी ५० लाख ७५ हजार ४०२ क्विंटल धान खरेदी केली. २०२३-२४ मध्ये १,३७८ कोटी खर्च केला. तर यावर्षातील खरेदी १ कोटी ७ लाख ५७ हजार क्विंटलवर आली. २०२४-२५ मध्ये १,६२८ कोटी निधी खर्च केला. या वर्षातील खरेदी ९९ लाख ६८ हजार क्विंटल इतकी होती. याचा आता आढावा घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.