Farming on AI : चर्चा तर होणारच! बारामतीत होतेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती

Use of Artificial Intelligence for Agriculture : आर्टिफिशियल इंटेलिजन्स शब्दामुळे बारामती चर्चेत आली आहे.
Farming on AI
Farming on AI Agrowon

Pune News : बारामती येथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती केली जात आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतीत ही वापर करता येतो यावर विश्वास बसताना दिसत आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा शेतीत होईल असे कोणालाच माहित नव्हते. तर तसा विश्वास देखील कोणाचा नव्हता. पण ही किमया पुण्याच्या बारामतीत झाली आहे. येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भारतातील पहिली शेती करण्यात यश आले आहे. येथे उसासह भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फ्लॉवर, कोबी ही या तंत्रज्ञानावर घेतली जात आहेत.

Farming on AI
Artificial intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमके काय?

सेन्सर्स काम काय करतात?

याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर पहिल्यांदाच शेतीमध्ये करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच याच्यामाध्यमातून विविध पिके घेण्यात आली आहेत.

या इंटेलिजन्सचा वापरामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाशची माहिती मिळते. तसेच हवेतील तापमान, हवेचा वेग आणि हवेतील आर्द्रता याची देखील माहिती मिळते. तसेच पाण्याचे मोजमाप, जमिनीची क्षारता आणि पिकांवर परिणाम करणाऱ्या घटकांचा तपास करणारी यंत्रणा यामध्ये असून ते सेन्सर्स काम करतात.

Farming on AI
Artifitial Intelligence (AI) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय रे भाऊ?

कसे काम करते?

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेन्सर्स असतात. जे अर्ध्या तासाला जमिनीतील आणि बाहेरील डाटा एकत्र करून सॅटॅलाइटला पाठवतात. ती माहिती आपल्या संगणकाला मिळते आणि त्यानंतर पिकाला काय हवं आणि काय नको याचे माहिती शेतकऱ्याला मिळते. ज्यामुळे जमिन, खत, पाणी याचे नियोजन करता येते.

भारतातील पहिला प्रयोग

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर शेती करण्याचा प्रयोग हा बारामतीमध्ये करण्यात आला. तो भारतामध्ये पहिल्यांदाच आणि पहिला प्रयोग आहे. तसेच याचे पुढचे पाऊल म्हणून बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी महाविद्यालय आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यात प्रयोग सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com