हेमंत जगतापशेडनेट हाउस संरचनेत शेती करण्यासाठी पिकांची निवड, कीड नियंत्रण आणि सिंचनाचे विशेष तंत्रज्ञान आवश्यक असते, ज्यासाठी शेतकऱ्यांकडे तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. शेडनेट हाउस हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त असून योग्य प्रशिक्षण व नियोजनासह वापरल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते..शेडनेट हाउस हे आधुनिक शेतीमधील एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. पिकांचे अति उन्हापासून आणि कीड-रोगांपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. शेडनेट हाउसमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते. शेडनेट हाउस हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयुक्त असून योग्य प्रशिक्षण व नियोजनासह वापरल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते..Modern Agriculture: ‘मॉडेल व्हिलेज’ चेलका गावाने अवलंबली नवी पीकपद्धती.विशेष ज्ञान आवश्यकया संरचनेत शेती करण्यासाठी पिकांची निवड, कीड नियंत्रण आणि सिंचनाचे विशेष तंत्रज्ञान आवश्यक असते, ज्यासाठी शेतकऱ्यांकडे तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. योग्य वापरासाठी प्रशिक्षण आवश्यक; चुकीच्या वापरामुळे नुकसान होऊ शकते..पर्यावरणावरील अवलंबित्वशेडनेट हाउस हे पॉलिहाउससारखे पूर्णपणे बंद आणि नियंत्रित वातावरण नसते. त्यामुळे बाहेरच्या हवामानाचा प्रभाव (उदा. जास्त पाऊस किंवा थंडी) आतल्या वातावरणावर पडतो.फायदेसूक्ष्म हवामान नियंत्रणशेडनेटमुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण नियंत्रित होते.तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग नियंत्रित राहतो, त्यामुळे पिकांना अनुकूल वातावरण मिळते.तीव्र सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करून पानांची भाजणे आणि पाण्याची गरज कमी होते..Modern Agriculture : रायगडमध्ये आधुनिक शेतीकडे वाढता कल.पिकांचे संरक्षणकीड आणि रोगांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करते, कारण नेटमुळे कीटकांचा प्रवेश मर्यादित होतो.तीव्र उन्हापासून वारा, गारपीट आणि अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून संरचनेमुळे पिकांचे रक्षण होते.उत्पादन व गुणवत्तेत वाढअनुकूल वातावरणामुळे पिकांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढते.फळे व फुले आकाराने व रंगाने आकर्षक येतात.वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते, ज्यामुळे बाजारात चांगला दर मिळतो..वर्षभर पीक लागवडहवामान नियंत्रणामुळे बिगर हंगामात पिके घेता येतात, म्हणजेच संपूर्ण वर्ष शेती करता येते.पाणी बचतठिबक सिंचन वापरल्याने ४० टक्के पाण्याची बचत होते.शेडनेटमुळे बाष्पीभवन कमी होते, ज्यामुळे पाण्याची बचत होते आणि सिंचनाची कार्यक्षमता वाढते..Modern Agriculture Technology: आधुनिक यंत्रांना हवी तंत्रज्ञानाची जोड.कीड, रोग नियंत्रणनियंत्रित वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.जाळीमुळे कीटकांचा प्रवेश कमी होतो, त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करता येतो..रोपवाटिकाभाजीपाला, फुलशेती व फळझाडांची रोपे तयार करण्यासाठी उत्तम वातावरण मिळते. टिश्यू कल्चर रोपे ‘हार्डनिंग’ करण्यासाठी उत्कृष्ट आहे.रोजगार निर्मितीशेडनेट शेतीमुळे ग्रामीण भागात युवकांसाठी रोजगार व व्यवसाय संधी निर्माण होतात.आधुनिक उपकरणे व सेन्सर्स वापरून स्मार्ट शेती करता येते..Agriculture Industry Modernization : कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकीकरण.गुंतवणूक , देखभालीचा खर्चप्रारंभिक खर्च जास्तबांधकामासाठी जीआय पाइप, शेडनेट, सिंचन प्रणाली इत्यादीसाठी मोठी गुंतवणूक लागते.पारंपरिक शेतीपेक्षा शेडनेट हाउस उभारणीचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो..देखभाल खर्चपाइप व फाउंडेशनला गंज, झीज याची काळजी घ्यावी लागते.जाळी कालांतराने फाटते किंवा झिजते, ज्यामुळे त्याची नियमित देखभाल आणि बदलण्याचा खर्च येतो. साधारणतः ३ ते ५ वर्षांनी नेट बदलावे लागते.पाइप गळती, कीटक नियंत्रण यासाठी नियमित देखभाल आवश्यक.वायुविजन समस्यायोग्य वायुविजन नसेल तर आत तापमान वाढून पिकांना त्रास होऊ शकतो..विजेवर अवलंबित्वपाणीपुरवठा, सिंचन पंप, वायुविजन पंखे इत्यादींसाठी वीज आवश्यक असते.मर्यादित पिकेसर्व प्रकारची पिके शेडनेटमध्ये घेता येत नाहीत; मुख्यतः फुले, भाजीपाला आणि रोपवाटिका योग्य ठरते..नैसर्गिक आपत्तीचा धोकाअतिवृष्टी, वादळ किंवा गारपीट झाल्यास शेडनेट हाउसचे नुकसान होऊ शकते.- हेमंत जगताप ८२७५३७१०८२(वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.