
Pune News : राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमधून विविध बाबींसाठी अर्थसाह्य केले जात आहे. बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेत फक्त वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर ५०,००० रुपये आर्थिक मर्यादेत मंजूर केली आहे.
क्षेत्रीयस्तरावर या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत करण्यात येते. या योजनांतर्गत अर्ज स्विकृती, लाभार्थी निवडीपासून ते अनुदान देण्यापर्यंतची कार्यवाही महा-डीबीटी पोर्टलव्दारे सुरु आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी काही निकष लागू करण्यात आले आहेत.
लाभार्थी निवडासाठीचे निकष
१. अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
२. शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा आवश्यक
३. आधार कार्ड आणि आधार संलग्न बँक खाते असावे
४. किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६ हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
५. मात्र दुर्गम भागात ०.४० हेक्टरपेक्षा पेक्षा कमी जमीनधारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात
६. दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६ हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही
सरकारने ०१ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध घटकांच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश केला आहे.
असे मिळणार अनुदान (रुपयात)
घटक…यापुर्वीचे अनुदान…नवे अनुदान
नवीन विहीर…२,५०,०००…४,००,०००
विहीर दुरुस्ती…५०,०००…१,००,०००
इनवेल बोअरींग…२०,०००…४०,०००
विद्युत पंप संच…२०,०००…४०,०००
वीज जोडणी आकार…१०,०००…२०,०००
सोलर पंप…३०,०००…५०,०००
शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण….१,००,०००…२,००,०००
ठिबक सिंचन संच…५०,०००…९७,०००
तुषार सिंचन संच…२५,०००…४७,०००
डिझेल इंजिन…०…४०,०००
एचडीपीई / पीव्हीसी पाईप…०…५०,०००
यंत्रसामुग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे)...०…५०,०००
परसबाग…०…५,०००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.