थोडक्यात माहिती...१. रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड अत्यावश्यक असून सरकारकडून अनुदानाची तरतूद आहे.२. व्ही-१, एस-३६, जी-२ व एस-५४ ही तुतीची शिफारस केलेली वाणे आहेत.३. हलकी, मध्यम किंवा भारी जमिनीत योग्य अंतर व पद्धतीने लागवड करावी.४. खत व पाणी व्यवस्थापन वेळेवर केले तर ३०,००० कि.ग्रॅ. पाला व भरघोस रेशीम कोष उत्पादन मिळते.५. एकदा लागवड केल्यास १५ वर्षांपर्यंत तुतीची पाने रेशीम किड्यासाठी वापरता येतात..Tuti Production: रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित असलेला कुटीर उद्योग असून रोजगार निर्मिती यातून होते. सध्या रेशीम उद्योगासंबंधी सरकार अनेक पाऊले उचलत आहे. रेशीम शेतकरी गटातून एकरी ३ लाख ५५ हजार तर पोक्रा योजने अंतर्गत वर्षात एकरी २ लाख २९ हजार अनुदान दिले जाते. रेशीम किड्यासाठी लागणाऱ्या तुतीच्या झाडांची लागवड करण्याचे शेतकऱ्यांनी जाणून घेतल्यास तुतीचे चांगले उत्पादन घेता येईल. .वाणतुतीच्या लागवडीसाठी व्ही-१, एस-३६, जी-२ आणि एस-५४ या वाणांची निवड करावी. तसेच एम-५ व्ही १ या कलमाचा वापर करावा. .जमीन तुतीच्या लागवडीसाठी हलकी, मध्यम ते भारी जमिनीची निवड योग्य ठरते. पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. त्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.२५ दरम्यान असावा. हलक्या जमिनीत खड्डा किंवा सरी पद्धतीने तर भारी जमिनीत जोड ओळ पद्धतीने तुती लागवड करावी. भारी जमिनीत दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर ९० सें. मी. ठेवावे. मध्यम जमिनीत ते ९० *६० सें.मी. तर हलक्या जमिनीत ६०*६० सें.मी. ठेवावे. .Reshim Udyog: रेशीम उद्योग कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.खत व्यवस्थापन तुतीची लागवड करण्याअगोदर म्हणजेच पावसाळ्याच्या अगोदर जमिनीत २० मे. टन प्रती वर्ष हेक्टर याप्रमाणे कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत किंवा ५ मे. टन गांडूळ खताचा वापर करावा. दुसऱ्या वर्षापासून पुढे रासायनिक खत ३५०:१४०:१४० किलो नत्र, स्फुरद, पालाश पाच मात्रेमध्ये विभागून द्यावे. .पाणी व्यवस्थापन तुती बागेला एकरी १.५ एकर इंच पाणी द्यावे. जमिनीच्या प्रतीनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्यास दंडातून किंवा मोकाट पद्धतीने ३० टक्के वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होते. .तुतीचे पीक कमरेच्या उंचीइतके होईपर्यंत आंतरमशागत करावी. त्यानंतर फारसे तण वाढत नाही. इतर पिकांच्या तुलनेत तुतीच्या पिकाला किडीचा उपद्रव कमी होतो. .उत्पादन व काढणी एक हेक्टर बागायती तुतीपासून एक वर्षात जास्तीत जास्त ३०,००० कि. ग्रॅ. पाला मिळू शकतो.तो ८०० ते १२०० कि. ग्रॅ. रेशीम कोषाचे उत्पादनासाठी पुरतो. शंभर अंडी पुंज संगोपनासाठी तुतीची १५०० किलो पाने लागतात. एकदा लागवड केल्यावर तुतीची सुमारे १५ वर्षे पाला मिळतो. त्यासाठी वेळेवर खते, पाणी व छाटणी करावी लागते. .वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):१. तुती लागवडीसाठी कोणते वाण योग्य आहेत? व्ही-१, एस-३६, जी-२ आणि एस-५४ वाणे रेशीम उद्योगासाठी उपयुक्त आहेत.२. तुती लागवडीसाठी जमीन कशी असावी? हलकी ते भारी, पाणी निचरा होणारी व सामू ६.५ ते ७.२५ असलेली जमीन योग्य आहे.३. तुतीच्या पिकाला किती पाणी द्यावे लागते? एकरी १.५ एकर इंच पाणी, १०–१५ दिवसांच्या अंतराने पाळ्या द्याव्यात; ठिबक सिंचन अधिक फायदेशीर आहे.४. तुतीच्या एका हेक्टर बागायतीत किती पाला मिळतो? वर्षाला सुमारे ३०,००० कि. ग्रॅ. पाला मिळतो, जो ८००–१२०० कि. ग्रॅ. रेशीम कोषासाठी पुरेसा असतो.५. एकदा लागवड केल्यावर तुतीची पाने किती वर्षे मिळतात? योग्य खत, पाणी व छाटणीने सुमारे १५ वर्षे पाला मिळतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.