Agriculture Department Action: शेतीसाठी पाठवलेला अनुदानित युरिया औद्योगिक कारणांसाठी वापरणाऱ्या कंपन्यांची राज्यभर कसून तपासणी केली जात आहे. कृषी विभागाने आतापर्यंत १५३ कंपन्यांची तपासणी केली. यात दोन ठिकाणी कृषी युरियाचा बेकायदेशीरपणे वापर झाल्याचे आढळले आहे. .पशुआहार, प्लायवूड, रंग निर्मिती तसेच इतर काही औद्योगिक उत्पादनांसाठी राज्यात अनेक कंपन्या कच्चा माल म्हणून युरिया वापरतात. मात्र या कंपन्यांना फक्त औद्योगिक युरिया वापरण्याची अट असून, तो अंदाजे ५५ रुपये किलो दराने विकत घ्यावा लागतो. परंतु शेतीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये विकला जाणारा कृषी वापराचा अनुदानित युरिया केवळ ५ ते ६ रुपये किलो दराने मिळतो. त्यामुळे कृषी युरियाची तस्करी करून तो औद्योगिक कंपन्यांना विकणाऱ्या टोळ्या राज्यात कार्यरत आहेत. या टोळ्यांमध्ये काही निविष्ठा विक्रेते आहेत. कृषी विभागाने या टोळ्यांच्या विरोधात राज्यभर तपासणी मोहीम घेतली आहे..Urea Misuse: अनुदानित १०० पोती युरियाचा गैरवापर.कृषी आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये दीडशेहून अधिक औद्योगिक कंपन्यांची तपासणी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी केली. त्यात दोन कंपन्यांमध्ये कृषी युरियाचा गैरवापर आढळून आला आहे. या दोन्ही प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. गुणनियंत्रण निरीक्षकाला औद्योगिक क्षेत्रात जाऊन कंपन्यांची तपासणी करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. .Subsidized Urea Misuse: अनुदानित युरियाचा औद्योगिक वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.कारण निविष्ठा कायद्यानुसार कृषी खताच्या परवानाधारकाच्या आवारात जाऊन निरीक्षकाला तपासणी करता येते. मात्र औद्योगिक कंपनीचे क्षेत्र या परवान्याच्या कक्षेत येत नाही. तरीदेखील पोलिसांची मदत घेऊन गुणनियंत्रण निरीक्षकांकडून तपासणी केली जात आहे. कृषी विभागाला संशय असलेल्या कंपन्यांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी मदत करावी, अशा सूचनादेखील राज्य शासनाने दिलेल्या आहेत..खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. राज्यातील युरिया आधारित उत्पादने बनविणाऱ्या औद्योगिक कंपन्या यापुढेही रडारवर असतील. आमची तपासणीची मोहीम चालूच राहील. खरिपात युरियाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरियाचा गैरवापर करणाऱ्या घटकांना नियंत्रित करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तस्करी करणाऱ्यांना शोधणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे ही कामे यापुढेही चालूच राहतील,’’ असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले..नामांकित कंपनीचा अहवाल मागविलादरम्यान, शेतकऱ्यांसाठी पाठवल्या जाणाऱ्या युरियाची तस्करी वाढल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना मुंडे यांनी एक पत्र देऊन त्यात तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक नेमण्यात यावे, असा आग्रह धरला आहे. त्यानंतर कृषी मंत्रालयाने कृषी आयुक्तालयाला एक पत्र पाठवून त्यात एका नामांकित उद्योग कंपनीच्या युरिया वापराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘राज्यात पशुआहार निर्मितीमधील एका कंपनीकडून अनुदानित युरियाचा गैरवापर व साठवणूक होते आहे. केंद्र शासनाने देखील या कंपनीवर छापा टाकण्याबाबत सूचित केले होते. त्यामुळे या प्रकरणाची तपासणी करून अहवाल पाठवा,’’ अशा सूचना शासनाने दिलेल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.