Study Movement : अभ्यास चळवळ आणि मंडळं

मी जेव्हा जेव्हा फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया वापरतो तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं दिसतंय का, हे आवर्जून बघत असतो. विनाकारण टाइमपास म्हणून चहाच्या कपाशेजारी ठेवलेल्या गुलाबाच्या फुलाला लाईक हाणून येण्यात मला रस नसतो.
Social Media
Social MediaAgrowon

मी जेव्हा जेव्हा फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया (Social Media) वापरतो तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं दिसतंय का, हे आवर्जून बघत असतो. विनाकारण टाइमपास म्हणून चहाच्या कपाशेजारी ठेवलेल्या गुलाबाच्या फुलाला लाईक हाणून येण्यात मला रस नसतो. गुड मॉर्निंग, गुड नाइट याच्या पलीकडंही सोशल मीडिया आहे हे समजून घेतलं पाहिजे.

Social Media
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, विराज तावरे या माझ्या मित्रानं नुकताच फेसबुकवर पोस्ट केलेला एक सुंदर व्हिडिओ माझ्या मनाला खूप भावला. तो व्हिडिओ पाहून माझं बालपण तर जागं झालंच, पण त्यातून एखादी चांगली गोष्ट घडू शकेल असंही वाटलं. त्या व्हिडिओमध्ये पुण्यातल्या एका गणपतीच्या छोट्याशा काचबंद मंदिरातल्या उजेडात दोन विद्यार्थी आपला अभ्यास करत बसली होती. गणपतीसमोरचा तेलाचा दिवाही त्यांना साथ देत होता. त्या छोटेखानी मंदिरासमोरून अनेक वाहनांची आणि माणसांचीही ये-जा चालूच होती, पण अभ्यासात मग्न असलेल्या लेकरांना याचं काहीच देणंघेणं नव्हतं.

त्यासंबंधी थोडी जास्त चौकशी केल्यावर मित्राला अशी माहिती मिळाली, की तिथं दररोज अभ्यासाला येऊन बसणाऱ्या एका पोराचं घर खूप लहान तर आहेच आणि त्यामानानं घरातील माणसांची संख्याही जास्त असल्यानं घरच्या गोंगाटात त्याचा अभ्यास होत नाही. दुसऱ्या मुलाचीही अवस्था तशीच आहे, शिवाय त्याच्या घरी असलेला बल्ब जुना झाल्यानं त्याचा उजेड कमी झालाय. त्यामुळे त्याला नीट वाचता येत नाही. या सगळ्या कारणांमुळे त्या पोरांनी ही युक्ती शोधून काढलीय. हातपाय गाळून न बसता परिस्थितीवर मात करण्याची ताकद गरजेतून निर्माण होते हे मात्र खरं.

हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला, की आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात/वार्डात वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी मंदिरं आहेतच. तिथं पुरेशी प्रकाशयोजनाही केलेली असतेच. जिथं जिथं अशी सोय असेल तिथं तिथं संबंधित आरतीच्या वेळा किंवा भजनाच्या वेळा सोडून जर अशा गरजू विद्यार्थ्यांना अभ्यास करायला परवानगी मिळाली, तर अशा अभ्यासाची चांगली सोय होऊ शकेल.

Social Media
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

ते मन लावून अभ्यास करू शकतील. अशा प्रकारे या माध्यमातून एक मोठी अभ्यास चळवळ उभी राहायला नक्कीच मदत होऊ शकेल. अनेक विद्यार्थी घडतील. ज्यांची खरीच अडचण आहे अशा विद्यार्थ्यांना मोलाची मदत होईल. यासाठी संबंधित मंडळं आणि देवस्थान कमिट्या यांनी याविषयी सकारात्मक विचार करावा असं मला वाटतं. जेणेकरून अशा विद्यार्थ्यांच्या यशाच्या आरतीत ही मंडळंही सहभागी होऊ शकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com