

Pune News: खुटबाव (ता. दौंड) येथे दौंड तालुक्यामध्ये सर्वात प्रथम शेतीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या महेंद्र थोरात यांच्या ऊस शेतीचा प्रयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासून अनुभवला. संतराज कॉम्प्युटर्सतर्फे खुटबाव येथे संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या ५१ विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिवारफेरी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रणालीचे तांत्रिक फायदे जाणून घेतले.
ऊस शेती पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एआय शेतीबद्दल कुतूहल होते. सुमारे दोन तासांच्या संवादामध्ये थोरात यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिल्यावर सर्वांचे चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
या वेळी शेतकरी महेंद्र थोरात म्हणाले की, बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी हा प्रकल्प राबवला आहे. १० हजार रुपये खर्चून नऊ महिन्यापूर्वी माझ्या शेतीमध्ये एआयचे युनिट बसवले होते. या प्रणालीचे तांत्रिक फायदे भरपूर आहेत. या प्रणालीमुळे वेळ, पैसा, खते, पाणी, श्रम, औषधे यांची बचत होते.
उसाला कीड लागल्यास मोबाईलवर अलर्ट दिला जातो. उसाला किती लिटर पाणी द्यावे? किती तास चालवावे? पावसाची शक्यता, औषधे फवारणी यादी व प्रमाण याबाबत सर्व संदेश घरबसल्या मोबाईलवर मिळतात. वैष्णवी ढवळे, समीक्षा शिंदे, गौरव थोरात या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून ए आय तंत्रज्ञान समजून घेतले. संतराज कॉम्प्युटरच्या संचालक कल्पना नवले, शिक्षक मोहित कुंभार, आर्यन गव्हाणे व विद्यार्थी उपस्थित होते.
आठवड्यातून दोनदाच पाण्याची गरज
दौंड तालुका आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर म्हणाले की, सध्या भारनियमनामुळे ऊस पीक जळताना अनुभवयास येते. परंतु हे तंत्रज्ञान वापरल्याने ऊस हिरवागार राहतो. तंत्रज्ञानामध्ये उसाला फक्त आठवड्यातून दोनदाच प्रत्येकी दोन तास पाण्याची गरज असते. या तंत्रज्ञानामुळे कमी आकाराच्या शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. बदलत्या काळानुसार हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने अवगत करणे गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.