Natural Farming : विद्यार्थ्यांनी केली वीस एकरांत नैसर्गिक शेती

The concept of toxin-free agriculture : नैसर्गिक शेती, विषमुक्त शेतीची संकल्पना राबविणाऱ्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या २० एकर क्षेत्रात नैसर्गिक शेती करून, चतुर्थ वर्षातील ९० विद्यार्थ्यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : नैसर्गिक शेती, विषमुक्त शेतीची संकल्पना राबविणाऱ्या छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या २० एकर क्षेत्रात नैसर्गिक शेती करून, चतुर्थ वर्षातील ९० विद्यार्थ्यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे.

किर्लोस विज्ञान केंद्रामार्फत नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबविला जात आहे. ‘समृद्ध गाव, आनंदी गाव’ अशी संकल्पना देखील राबविली जात आहे.

त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोसच्या चतुर्थ वर्षातील ९० विद्यार्थ्यांनी नैसर्गिक पद्धतीने सर्व प्रक्षेत्रावर भाजीपाला लागवड, भुईमूग बीजोत्पादन तसेच कडधान्य, कलिंगड व झेंडूची लागवड केली आहे.

Natural Farming
Natural Farming : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती उपयुक्त

लागवडीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे या विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे.

यामध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्र याचा वापर करून जिवामृत, बीजामृत, घनजिवामृत तयार करणे तसेच प्रक्षेत्रावरील वनस्पतीच्या पाल्याचा वापर करून दशपर्णी अर्क, निमास्त्र, अग्निअस्त्र अशा प्रकारची नैसर्गिक कीटकनाशके शेतावरच तयार करून वापरण्यात आली. लागवडीकरिता देशी बियाण्यांची लागवड करण्यात आली.

हा प्रकल्प राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र किर्लोसद्वारे सर्व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या केंद्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवली येथील नैसर्गिक शेतीतज्ज्ञ प्रतीक्षा भालेकर यांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी नैसर्गिक शेतीच्या लागवडीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ही संकल्पना देशभर राबविण्यासाठी आग्रही असलेले संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com