Kolhapur Flood Management : हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई

Flood Management : हलगर्जीपणा केल्यास संबंधीताला कडक कारवाईला सामोर जावे लागेल. याची तालुक्यातील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा तहसीलदार समीर माने यांनी दिला.
 Flood Management
Flood ManagementAgrowon

Kolhapuer News : येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. महापूर व अन्य गोष्टींमुळे आपत्ती उद्‍भवू शकते. अशा काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग व दक्ष राहावे.

हलगर्जीपणा केल्यास संबंधीताला कडक कारवाईला सामोर जावे लागेल. याची तालुक्यातील प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा तहसीलदार समीर माने यांनी दिला.

येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक झाली. तहसीलदार माने अध्यक्षस्थानी होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेला आदेश व सूचना सांगितल्या. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई आदी उपस्थित होते.

 Flood Management
Flood Management : संभाव्य पूरस्थितीबाबत सूक्ष्म नियोजन करावे

तहसीलदार माने म्हणाले, की पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच विभागांनी जय्यत तयारी करण्याची गरज आहे. कुठेही मनुष्य, पशुहानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष काढण्यात येणार असून सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत काम केले पाहिजे. चार महिन्यांत कोणाचेही काहीही ऐकून घेतले जाणार नाही.

गटविकास अधिकारी दाईंगडे यांनी पिण्याचे पाणी व जलजन्य आजार, साथीचे रोग याबाबत आरोग्य यंत्रणेने पुरेशी दक्षता घेण्याविषयी सूचना केली.

पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी नियंत्रण व व्यवस्थापन, बांधकाम विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, अन्नधान्य साठा, बोटींची व्यवस्था यासह विविध गोष्टींवर चर्चा झाली. एसटीचे पृथ्वीराज चव्हाण, संदीप देसाई, रवींद्र गुरव, मनीषा कांबळे, अप्पासाहेब भोपळे आदी उपस्थित होते. धनाजी चव्हाण यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com