Raigad News: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात नव्याने सुरू होणाऱ्या गतिमान भात पैदास तंत्रज्ञान प्रकल्पामुळे देशाच्या अन्नसुरक्षेसह नागरिकांच्या पोषणसुरक्षेस बळकटी मिळेल,असा विश्वास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी आज येथे व्यक्त केला. संशोधन केंद्राच्या विविध प्रक्षेत्र व प्रयोगशाळांना भेट दिल्यावर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते..यावेळी डॉ. भावे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेसोबतच्या प्रकल्पांचा तसेच विकासात्मक बाबींचा आढावा घेतला. संशोधन केंद्र जागतिक दर्जाचे होण्यासाठी सर्वच प्रकल्पांना आवश्यक निधी व तांत्रिक मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा करताना दिली. संशोधन केंद्राची मुख्य इमारत १०६ वर्षांपूर्वीची असल्याने ती वारसा म्हणून जतन करण्याची गरज त्यांनी.Agricultural Research Centre Kolhapur : पोहे, चिरमुऱ्यासाठी भाताचे नवे वाण, राधानगरी कृषी संशोधन केंद्राकडून विकसित.प्रतिपादित केली. जीवनात वक्तशीरपणा फार महत्त्वाचा असून सर्वांनीच वेळेचे कसोशीने पालन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. संशोधन केंद्राचा चेहरामोहराझपाट्याने बदलत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले..National Banana Research Centre: राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या समितीवर डाॅ. के. बी. पाटील.यावेळी कुलगुरूंच्या पत्नी स्नेहल भावे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, सहा. .भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ.मीनाक्षी केळुस्कर, मृदा शास्त्रज्ञ डॉ.देवदत्त जोंधळे, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे प्रामुख्याने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.