Vineyard Damage
Grape Crop Damage Agrowon

Vineyard Damage : खुड्यावर आलेली मंडप पद्धतीची द्राक्षे भुईसपाट

Grape Damage : खेडलेझुंगे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास साहेबराव राहणे यांची दोन एकर सुधाकर वाणाची मंडप पद्धतीची द्राक्ष बाग पडल्याने भुईसपाट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे १० लाखांवर नुकसान झाले आहे.
Published on

Nashik News : खेडलेझुंगे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास साहेबराव राहणे यांची दोन एकर सुधाकर वाणाची मंडप पद्धतीची द्राक्ष बाग पडल्याने भुईसपाट झाली आहेत. यामुळे शेतकऱ्याचे १० लाखांवर नुकसान झाले आहे.

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल राहिला. अशा परिस्थितीत विविध समस्यांचा सामना करून तयार केलेली द्राक्ष बाग ऐन खुडे सुरू होण्याच्या तोंडावर कोसळली. द्राक्षांची फुगवण होऊन मण्यांमध्ये साखर उतरली होती.

Vineyard Damage
Grape Export: निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव!

असे असताना बाग पडल्याने शेतकरी राहणे यांचे मोठे नुकसान झालेले आहे. बागेचे आधार देणारे अँगल वाकून पडल्याने मंडप पद्धतीच्या तारा तुटल्या आहेत. द्राक्ष वेलींवर माल असल्याने वजनामुळे बाग पुन्हा उभी करणे अडचणीचे झाले आहे.

त्यातच बाग पडल्याने काही वेली मोडल्या तर गुणवत्तापूर्ण तयार द्राक्ष घडांचे नुकसान झालेले आहे. लागवडीपश्‍चात १० ते १२ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत द्राक्ष बाग राखता येते. मात्र लाखो रुपयांचे भांडवल गुंतवणूक करून उभी केलेली बाग पडल्याने राहणे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

Vineyard Damage
Grape Harvesting Season : बाजार समितीच्या अधिकृत केंद्रांवरच द्राक्षमण्यांची विक्री करा

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

काढणीच्या अवस्थेत आलेली द्राक्षबाग कोलमडून पडल्याने तयार द्राक्ष गडांची नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचा प्रतवारी व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे यासह बाग उभी करून कशी बसे हे घड बाहेर काढावे लागतील.

त्यातच प्रतवारीत घसरण झाल्याने टिकवनक्षमता कमी होणार आहे. त्यात पुन्हा बाग उभी करण्याचा व काही वाचलेला द्राक्ष घडांची खुडे करण्याचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे वार्षिक फळपीक असलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास या घटनेमुळे हिरावून घेतल्याची स्थिती आहे.

अचानक हे संकट कोसळल्याने सर्व काही होत्याचे नव्हते झाले. बाग सोडून दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. बाग पडल्याने कुटुंबाचा आर्थिक कणा मोडून संसाराचा आधार तुटला आहे. या आकस्मिक आपत्तीचा शासकीय स्तरावर पंचनामा करून कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा.
-कैलास राहणे, नुकसानग्रस्त शेतकरी, खेडलेझुंगे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com