Financial Relief Demand: अकोला जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः तेल्हारा तालुक्यातील शेकडो एकरांवरील केळी बागा जमिनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. .या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बनाना महासंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी गुरुवारी (ता.११) नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले आणि शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली..Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर .सोमवारी (ता.१) जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कापणीच्या टप्प्यावर आलेल्या अनेक केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून उत्पादनासह शेतकऱ्यांची मोठी गुंतवणूकही वाया गेली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी किरण चव्हाण यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसराला भेट दिली..Rain Crop Damage: पूर्वमोसमी पावसाचा शिरोळमधील १,७६० हेक्टरवरील पिकांना फटका.यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. हनुमंतराव चिकणे, राष्ट्रीय समन्वयक सचिन कोरडे, अकोला जिल्हाध्यक्ष अनंता इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष रौंदळे, सचिन पाटील, गोपाल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली..यावेळी बोलताना किरण चव्हाण यांनी शासनाने नुकसानग्रस्त भागात तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत तसेच प्रभावित शेतकऱ्यांना विलंब न लावता भरपाई द्यावी, अशी मागणी केली. केळी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व बनाना महासंघाने व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.