Crop Insurance Registration : बोगस पीकविमा नोंदणी रोखल्याने आकडेवारी कमी

Bogus Crop Insurance : यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेत बोगस पीकविमा नोंदणी रोखल्याने आकडा कमी दिसत आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेत बोगस पीकविमा नोंदणी रोखल्याने आकडा कमी दिसत आहे. तसेच बँकांनी १५ ऑगस्टपर्यंत पीकविमा नोंदणी करण्याची मुभा असल्याचा खुलासा कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे.

५ ऑगस्ट रोजी ‘ॲग्रोवन’मध्ये ४ लाखांवर शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ हे वृत्त छापून आल्यानंतर कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक विनयकुमार आवटे यांनी या बाबत खुलासा प्रसिद्ध केला आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : विम्याचा लाभ देण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम

महाराष्ट्रात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. ३१ जुलैअखेर राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ अर्ज नोंद झाली होती. मात्र, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ३१ जुलै ही अंतिम तारीख असली तरी बँकांमार्फत १५ ऑगस्टपर्यंत पोर्टलवर नोंदणी सुरू असते.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Registration : चार लाखांवर शेतकऱ्यांची पीकविम्याकडे पाठ

त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत राज्यात १ कोटी ६७ लाख, ८० हजार ५२६ पीकविमा नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २ लाख ८६ हजार ९१८ ने ही आकडेवारी कमी आहे. मात्र, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा घेणे, शासनाच्या जमिनीवर पीकविमा उतरवणे, आहे.

त्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा उतरवणे, पिकांची लागवड नसताना विमा उतरवणे असे २ लाख ८२ हजार अर्ज अपात्र ठरविले आहेत. अपात्र अर्जांची संख्या विचारात घेतली तर मागील वर्षीइतकी नोंद झाल्याचे समोर येत, असेही पत्रात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com