Pune News: शेतकरी कंपन्यांच्या विस्तारासाठी व यशासाठी नेतृत्व, भांडवल, बाजारपेठ, ‘गुणवत्ता, व्हॅल्यू चेन’, प्रक्रिया उद्योग, निर्यात, मार्केटमधील जोखीम व्यवस्थापन या बाबी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. ‘सकाळ-ॲग्रोवन’तर्फे पुणे येथे शनिवारी (ता. सहा) झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय एकदिवसीय एफपीसी (शेतकरी उत्पादक कंपनी) महापरिषदेत तज्ज्ञांनी हा सूर व्यक्त केला. .शोध बाजारपेठांचा, नव्या संधींचा! या विषयावर महापरिषदेतील या पहिल्या चर्चासत्रात नव्या दिशा, नव्या शक्यता विषद झाल्या. राज्यातील विविध भागांतून आलेले शेतकरी कंपन्यांचे अनुभवी प्रतिनिधी आणि तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र पार पडले..चर्चासत्रात सुनील पवार (माजी पणन संचालक), मधुकर गवळी (अध्यक्ष, ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक), सतीश गिरसावळे (अध्यक्ष, कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक कंपनी, चंद्रपूर),अनिता माळगे (अध्यक्षा, यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी,सोलापूर) आणि अनिल जाधव (कमोडिटी तज्ज्ञ, ॲग्रोवन डिजिटल, पुणे) यांचा सहभाग होता..सत्राची सुरुवात करताना सुनील पवार म्हणाले, की सन २००२ ते २०१७ दरम्यान केवळ ७ ते ८ हजार शेतकरी कंपन्या होत्या. त्यांची वाढ आता वेगाने होत आहे. मात्र नेतृत्व, प्रशासन, अटी- निकषांची पूर्तता (कप्लायन्सेस), भांडवल उभारणी या अडचणी कायम आहेत. राज्यस्तरावर समन्वय साधणारे ‘पॅरेट बोर्ड’ किंवा स्वतंत्र सेल निर्माण झाला तर एफपीसींना मोठा आधार मिळेल..FPC Conclave 2025: राज्यात 'एफपीसी'साठी स्वतंत्र धोरण, यंत्रणा तयार करु- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे .उत्पादन थेट बाजारात विकणे म्हणजे ‘सप्लाय चेन’. तर प्रतवारी, हाताळणी, शीतगृह, ब्रँडिंग यांसारख्या प्रक्रिया म्हणजे ‘व्हॅल्यू चेन’. ही साखळी मजबूत झाली, तर एफपीसीचे स्वतःचे भांडवल तयार होते. भांडवल, मार्गदर्शन आणि बाजारपेठ या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज या वेळी श्री. पवार यांनी व्यक्त केली..निर्यात, दर्जा आणि सातत्यावर हवा भरमधुकर गवळी यांनी द्राक्ष व कांदा या पिकांतील कार्याचा प्रवास सांगितला. नर्सरी व्यवसाय, मग ‘ट्रेडिंग’ त्यानंतर निर्यात अशा टप्प्यांमधून जाताना आलेल्या अडचणींनीच योग्य मार्ग दिला असे ते म्हणाले. द्राक्ष निर्यात करताना सभासदांकडून दर्जेदार उत्पादन घेणे, वेळेत माल पुरवणे,‘ कमिटमेंट’ पाळणे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. कांद्याच्या बियाण्यातील भेसळ लक्षात आल्यानंतर विकसित केलेल्या वाणांविषयी माहिती त्यांनी दिली. निर्यात वाढवण्यासाठी शीतगृह गरजेचे होते. सुरवातीला भाडेतत्त्वावर सुविधा घेतली. आज स्वतःचे शीतगृह उभारले. संपूर्ण ‘व्हॅल्यू चेन’ मजबूत केली, तर उलाढाल आपोआप वाढते असे गवळी यांनी सांगितले..शेतकरी हीच ताकदचंद्रपूर येथील आदिवासी व पूरप्रवण भागात कृषक स्वराज्य शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी करताना आलेल्या अनुभवाचे प्रभावी विश्लेषण सतीश गिरसावळे यांनी केले. या भागात कापूस, सोयाबीन, मिरची, भात अशी पारंपरिक पिके घेतली जातात. मात्र पूरस्थितीमुळे ऑगस्टनंतर योग्य पर्याय फक्त मिरचीचा मिळाला. देशातील ४५ हजार कोटींच्या मिरची बाजारपेठेतील संधी अधोरेखित करताना त्यांनी स्थानिक स्तरावर विक्री व्यवस्था उभी केली..रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनावर भर दिला. शेतकऱ्यांना ट्रे-कोकोपीट तंत्रज्ञानाबाबत प्रोत्साहन दिले. आमची शेतकरी कंपनी छोटी आहे. मात्र ३०० दिवस उलाढाल सुरू राहील असे नियोजन केले. माहितीची कमतरता असूनही योग्य मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचा विश्वास यावर काम पुढे गेले. त्यातून शाश्वत घोडदौड झाल्याचे गिरसावळे म्हणाले..FPC Conclave 2025: ‘ॲग्रोवन’तर्फे पुण्यात आज ‘एफपीसी’ महापरिषद.प्रक्रिया हाच बदलाचा मार्गसोलापूरच्या यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने महिलांच्या नेतृत्वात उभा केलेला आदर्श अनुभव अनिता माळगे यांनी मांडला. सुमारे २४०० महिला सभासद, ३२ गावांमध्ये संघटन, प्रक्रिया केंद्र, नैसर्गिक व जैविक शेतीचा प्रसार, शेतमाल प्रक्रिया करून विक्री यामुळे कंपनी ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याचे कशी प्रतीक बनली हे त्यांनी सविस्तर सांगितले. महिलांच्या पाच-पाच जणींचे गट बनवून त्यांना कर्जसाह्य मिळवून दिले..आज व्यवसायांमधून दरमहा २५ ते ३० हजारांची मिळकत त्यातून निर्माण होत आहे. महिलांना ट्रॅक्टर व इलेक्ट्रिक पिकअप चालवण्याचे प्रशिक्षण देणे, पाच एफपीसींची स्थापना, स्मार्ट प्रकल्पातून ज्वारी प्रक्रिया या उपक्रमांनी कंपनीचे काम विस्तारत आहे. सभासदांच्या धान्याची थेट विक्री न करता प्रक्रिया करून ते विकल्यास अधिक नफा मिळतो. तोच शेतकरी आणि महिलांसाठी बदलाचा मुख्य मार्ग ठरतो असेही अनिता म्हणाल्या..बाजारपेठ केवळ मागणी–पुरवठ्यावर ठरत नाहीकमोडिटी तज्ज्ञ अनिल जाधव यांनी ‘स्पॉट’ आणि ‘फ्यूचर मार्केट’मधील संधी, धोरणात्मक बदल आणि जागतिक घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम याबद्दल माहिती दिली. कोरोनानंतर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने दरांवर मोठा परिणाम झाला..केवळ मागणी व पुरवठाच नाही, तर सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय वाटाघाटी, बाजारातील ‘सेंटीमेंट्स’ या सर्वांचा किमतींवर प्रभाव असतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बाजारपेठेतील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जोखीम व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी एफपीसी चळवळीने अधिक व्यापक, सक्षम दिशा घेण्याची योग्य वेळ असल्याचे महापरिषदेतून स्पष्ट झाले. सूत्रसंचालन ॲग्रोवनचे सहायक संपादक अमित गद्रे यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.