Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Parbhani News : केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे यंदा २०२४ संपूर्ण देशभर विविध अभिनव उपक्रमांसह ७ वा पोषणमाह साजरा करण्यात आला.
 Awards
AwardsAgrowon
Published on
Updated on

Women And Child Development Depatment : परभणी ः केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे यंदा २०२४ संपूर्ण देशभर विविध अभिनव उपक्रमांसह ७ वा पोषणमाह साजरा करण्यात आला. यामध्ये परभणी ग्रामीण आणि शहरी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्र, तालुका व जिल्हा जिल्हा पातळीवर विविध उपक्रमांचे उत्कृष्ट आयोजन केल्या बद्दल परभणी जिल्ह्याचा राज्यस्तरीय विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली आहे.

रविवारी (ता. १३) मुंबई येथे महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते, तर महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीमध्ये परभणी जिल्ह्याचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी मिलिंद वाघमारे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com