Disaster Relief : अतिवृष्टी, पूरस्थिती, गारपीटीमध्ये जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून खर्च करण्यास मुभा; राज्य सरकारचा निर्णय
Maharashtra Floods : २७ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपासाठी निर्णय घेता येतो. परंतु यामध्ये केवळ टंचाईच्या काळाचा समावेश होता. आता मात्र अतिवृष्टीसह पूर स्थिती, गारपीटसाठी निधीचा वापर करता येणार आहे.