Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० निर्णय; महसूल, जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे निर्णय
Cabinet Meeting Maharashtra : मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतीमाल निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.