Sugar Assessment : राज्य बँकेने साखरेचे मूल्यांकन ३०० रुपयांनी वाढविले

Sugar Rate : राज्य बॅंकेने साखर कारखानदारांना दिलासा देताना साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवरून ३४०० रुपये केले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Kolhapur News : राज्य बॅंकेने साखर कारखानदारांना दिलासा देताना साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवरून ३४०० रुपये केले आहे. बॅंकेच्या नव्या आदेशानुसार, कारखान्यांना या वाढीव दराचा लाभ तातडीने मिळणार आहे. याचा फायदा कारखान्यांना हंगामात भांडवल उपलब्धतेसाठी होईल.

वाढीव मूल्यांकनामुळे कारखान्यांना बॅंकेकडून मिळणारी पहिली उचल ३०६० रुपये प्रतिक्विंटल इतकी मिळेल. यापूर्वी मूल्‍यांकनाच्या ८५ टक्के रक्कम उचल म्हणून मिळत होती. आता ही उचल ९० टक्के मिळेल. शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत पोहोच व्हावी, या उद्देशानेच मूल्‍यांकन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बॅंकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Sugar Factory
Sugar Production : यंदाच्या ऊस हंगामात साखर उत्पादन घटलं, ९० लाख क्विंटल उत्पादन कमी, ऊस गाळपातही पिछाडी

बॅंकेने १ जानेवारी २०२० ला साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये केले होते. यानंतर पुढील तीन वर्षे बॅंकेने याच मूल्यांकनावर साखर कारखान्यांना कर्जे दिली. सध्‍या साखरेच्या वाढलेल्या किमती आणि कारखान्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ गृहीत धरून बॅंकेने २८ डिसेंबर २०२३ पासून मूल्यांकन वाढविले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून राज्यातील अनेक कारखाने शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी बॅंकेकडून कर्जे घेतात. या कर्जांच्या आधारे शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते. साखर विक्री नंतर राज्य बॅंकेकडे कर्जाचा भरणा होतो.

Sugar Factory
Sugar Production : केंद्राकडून जानेवारीसाठी २३ लाख टनांचा साखर कोटा

अतिरिक्त १०० रुपये टॅगिंग आकारणार

२०२० पर्यंत राज्य बॅंक दर तीन महिन्‍याला साखर दराचा आढावा घेऊन मूल्‍यांकन ठरवत होती. यामुळे साखरेचे दर घसरल्‍यास त्‍याचा फटका कारखान्यांना बसत होता. २०२० ला मात्र किमान विक्री मूल्याइतकी किंमत गृहीत धरुन साखरेचे मूल्यांकन ३१०० रुपये केले. यानंतर साखरेच्या दरात चढउतार होत राहिली.

परंतु बॅंकेने कोणताच निर्णय घेतला नव्हता. काही कारखानदारांनीही मूल्यांकन वाढविण्याबाबत बॅंकेला विनंती केली होती. अखेर तीन वर्षांनी बॅंकेने मूल्यांकन वाढविले. सध्याच्या सुरू हंगामात अंदाजित गाळपापेक्षा कमी गाळप होणार असल्याचे गरजेनुसार प्रतिक्‍विंटल १०० रुपये अतिरिक्त टॅगिंग आकारण्यात येणार आहे.

बॅंकेने साखर मूल्‍यांकन वाढविल्याचा फायदा ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांनाही होईल. सध्य स्‍थितीचा आढावा घेऊन आम्ही मूल्यांकनात वाढ केली. साखर कारखान्यांना जादा रक्कम मिळेल. त्यामुळे एफआरपी प्रलंबित न राहता ती वेळेत मिळेल. कारखान्यांनी कर्जाची रक्कम प्राधान्याने एफआरपीसाठी वापरावी, अशा सूचना केल्या आहेत.
विद्याधर अनास्‍कर, प्रशासक, राज्य बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com