Kharif Season : खरिपासाठी आतापासून तयारीला लागा

Fertilizer Update : शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Yavatmal Kharif Season News : शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे बियाणे, खते, कीटकनाशक आदींचा पुरवठा शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी करावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री राठोड बोलत होते.

यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

Kharif Season
Kharif Season 2023 : शेती मशागतीची दरवाढ

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या हंगामाच्या भरवशावरच वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो. शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे बियाणे, खते आदी कृषिनिविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे, अशा सूचना केल्या. जिल्ह्यात यंदा बियाणे व खत मुबलक प्रमाणात आहे.

खतांचे नियोजन यंदा प्रशासनाने चांगले केले आहे. यंदा खत व बियाण्यांची अडचण शेतकऱ्यांना जाणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कपाशी बियाण्यासाठी आवश्यक असलेले पाकीट जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण जाणार नाही.

‘बोगस बियाण्यांवर कारवाई करा’

परराज्यांतून व इतर जिल्ह्यांतून कोणत्याही मार्गाने बोगस बियाणे येणार नाही, यासाठी चेक पॉइंटवर पथक तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

घरगुती सोयाबीन बियाण्यांवर भर

गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना सोयाबीनच्या घरगुती बियाण्याला पसंती दिली आहे. यंदाही जवळपास ८० टक्के सोयाबीन बियाण्याचा पेरा घरगुतीचा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, प्रशासनानेही सोयाबीन बियाणे प्रशासनाने मागणी केली असून, बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com