Neral News: एसआरटी तंत्रज्ञान हे विविध हंगामी पिके व फळबागांसाठी उपयुक्त ठरत असून जल-मृदा संधारण, सेंद्रिय कर्ब वाढ आणि दर्जेदार पीक उत्पादनासाठी प्रभावी आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, प्रतिपादन कृषी संचालक अंकुश माने यांनी केले. .मालेगाव-नेरळ येथील सगुणा बागेमध्ये आयोजित एसआरटी शेतकरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी ‘ग्लोबल विकास ट्रस्ट’चे संस्थापक मयंक गांधी, कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, कार्बन क्रेडीट विषयातील तज्ज्ञ चिन्मयी देऊळगावकर, चंद्रशेखर भडसावळे, प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते..SRT Farming Technology: ‘एसआरटी’ने सावरली शेती अन् माती !.भडसावळे म्हणाले, की एसआरटी पद्धतीमुळे जमीन सुधारणा, पोषक अन्नधान्य निर्मिती, उत्पादनवाढ साध्य होत आहे. राज्यासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा येथील शेतकरीही या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. १७ शेतीशाळांद्वारे हे तंत्रज्ञान हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे..श्री. चिपळूणकर म्हणाले, की जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविल्याशिवाय जमीन सुपीकता आणि पीक उत्पादन वाढणार नाही. एसआरटी तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे साध्य होते. मागच्या पिकाचे जमिनीत कुजणारे अवशेष हेच सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त ठरतात. यातून जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणू तसेच पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होतात..SRT Technology : ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा जागतिक स्वीकार होईलच.देऊळगावकर म्हणाल्या, की एसआरटी तंत्रज्ञानामुळे कार्बन संवर्धन होत आहे. याचे चांगले परिणाम जमीन सुपीकता आणि पीक उत्पादनावर दिसतात. हे तंत्र वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदी ठेवणे आवश्यक आहे..श्री. गांधी म्हणाले, की गाव आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलायचे असेल तर शेती व्यवस्थापन पद्धतीमध्ये बदल आवश्यक आहेत. कार्यक्रमात राज्य व परराज्यातील ३३ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.