Agriculture Update : शहादा तालुक्यात शेतीकामांना वेग

Agriculture Works : पाऊसदेखील अधूनमधून हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता जवळजवळ मिटली आहे. अधूनमधून पावसाची रिप-रिप सुरूच असून, शेतीकामांना वेग आला आहे.
Agriculture Work
Agriculture WorkAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : शहादा तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांची स्थिती उत्तम असून, त्यांची वाढदेखील जोमाने होत आहे. शेतकरी चांगलाच आनंदित झाला असून, पाऊसदेखील अधूनमधून हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता जवळजवळ मिटली आहे. अधूनमधून पावसाची रिप-रिप सुरूच असून, शेतीकामांना वेग आला आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती. शेतामध्ये पाण्याचे तलाव साचले होते. या जोरदार पावसामुळे पिकांना पूर्णतः जीवदान मिळाले आहे. एवढेच नव्हे तर जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आल्याने मोठी मदत मिळाली आहे. नद्या प्रवाहित झाल्या आहेत. सातपुड्यातील उनपदेवजवळील दरा व चिरडे धरणे पूर्ण क्षमतेने भरून ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत.

Agriculture Work
Agriculture Update : उमरग्यात आंतरमशागतीच्या कामांना वेग

शिवाय सुसरी राणीपूर दुधखेडा धरणांमध्ये चांगल्या प्रकारे साठा निर्माण झाला आहे. कापूस, मिरचीला संजीवनी शेतकऱ्यांनी मे महिन्यात लागवड केलेल्या कापूस व मिरची पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. तालुक्यात केळी, पपई, कापूस, मिरची पिकांची लागवड सर्वाधिक आहे.

Agriculture Work
Agriculture MSP : ‘एमएसपी’ वरून गदारोळ

जिल्ह्यात पपई व केळीची सर्वाधिक शहादा तालुक्यात लागवड केलेली आहे. ही पिके तीन ते चार फूट उंचीची झाली आहेत. मिरची पिकाची स्थितीदेखील उत्तम झालेली आहे. गेल्या वर्षी शहादा तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. या वर्षी मात्र शेतकऱ्यांनी मका पिकावर भर दिला आहे. पावसामुळे सारीच पिके डोलायला लागली आहेत.

शेतमजुरांना रोजगार

शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिकांना दोन ते तीन वेळा रासायनिक खत दिल्याने पिकांची वाढ लवकर झाली आहे. आता शेतकऱ्यांनी पुन्हा खत टाकायला सुरवात केली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी केली जात आहे. एकप्रकारे पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. सर्वत्र शेतीकामांना वेग आलेला आहे. विशेष म्हणजे पिकांमध्ये गवत अर्थात तण अधिक वाढल्याने ते काढण्यासाठी बाहेरगावाहून शेतमजूर आणावे लागत आहेत. शेतमजुरांनादेखील रोजगार मिळाला आहे. जनावरांना चारा उपलब्ध झालेला आहे. चारा विक्री करणारे सक्रिय झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com