Voter Review Campaign : नगर जिल्ह्यात विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम २१ जुलैपासून

Central Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्दशनानुसार २१ जुलैपासून ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत विशेष मतदार संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम राबविली जाणार आहे.
Voter Regestration
Voter RegestrationAgrowon
Published on
Updated on

Nagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्दशनानुसार २१ जुलैपासून ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत विशेष मतदार संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम राबविली जाणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांची तपासणी, दीड हजारांपेक्षा जास्त मतदान असल्यास नवीन मतदान केंद्राचा प्रस्तावही तयार केले जाणार आहेत, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदार संघांतील ३ हजार ७२२ मतदान केंद्रस्तरात ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी (प्रांताधिकारी), सहायक मतदान नोंदणी अधिकारी (तहसीलदार), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यानंतर २१ जुलैपासून ३० नोव्हेंबरपर्यंत ही विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम राबविली जाणार आहे. मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, फर्निचर, स्वच्छतागृह, रॅम्प आदी सुविधा आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे.

इमारती मोडकळीस आलेल्या असल्यास सुस्थितीमधील इमारतीमध्ये मतदान केंद्र स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १ हजार ५०० पेक्षा जास्त असल्यास नवीन मतदान केंद्रासाठीचे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.

Voter Regestration
Ahemadnagar Elections : विखे-पाटलांना मोठा धक्का; गणेश कारखान्यावर थोरात-कोल्हेंची सत्ता

बी.एल.ओ. घरोघरी जाऊन नवीन मतदारांची नोंदणी, दुबार नावे आणि मृत व्यक्तींची नावे वगळण्याची मोहीम राबविणार आहेत. मतदार यादीला आधार नोंदणी ही यात

कालावधीत केली जाणार आहे. ता. १ जानेवारी २०२४, ता. १ एप्रिल २०२४, ता. १ जुलै २०२४ आणि ता.१ ऑक्टोबर २०२४ या अर्हता तारखेस १८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना आगाऊ नाव नोंदणीचा अर्ज भरण्याची विशेष तरतूद आहे.

अशा नवमतदारांनी अर्जासमवेत वयाचा योग्य तो पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. सर्व मतदारांची ता. १७ ऑक्टोबर रोजी एकत्रित मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्येक मतदाराने आपल्याजवळच्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात जाऊन आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी.

काही हरकती असल्यास ता. ३० नोव्हेंबरपर्यंत त्या दाखल करता येतील. १ जानेवारी २०२४ ला यादी प्रसिद्धीच्या मंजुरीसाठी सादर केली जाणार असून, ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महिला, दिव्यांग, तृतीयपंथी आणि बेघर व्यक्तींसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. भटक्या-विमुक्त जाती-जमातीमधील व्यक्तींचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहिमेत प्रयत्न केले जाणार आहेत.

...असे आहेत अर्ज क्रमांक

- मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्रमांक : सहा

-दुबार, मयतांची नावे वगळण्यासाठी अर्ज क्रमांक : सात

(मतदार मयत झाला असल्यास नाव वगळण्यासाठी मृत्यूचा दाखला आवश्‍यक)

- स्थलांतरित मतदारांना नाव नोंदणीसाठी अर्ज क्रमांक : आठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com