Soybean 'BBF' Method : पाणथळ जमिनीत सोयाबीन ‘बीबीएफ’ पद्धतीने लावा

Kharif Season : वाशीम जिल्‍ह्यात येत्या खरीप हंगामामध्‍ये तीन लाख चार हजार ८० हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन हे मुख्‍यपीक लागवडीचे नियोजन आहे.
BBF Soybean
BBF SoybeanAgrowon
Published on
Updated on

Washim Soybean News : वाशीम जिल्‍ह्यात येत्या खरीप हंगामामध्‍ये तीन लाख चार हजार ८० हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन हे मुख्‍यपीक लागवडीचे नियोजन आहे. मागील तीन वर्षांतील जिल्‍ह्यात सोयाबीन उत्‍पादकतेचा विचार करता सध्याच्या स्थितीत सोयाबीन उत्पादकता वाढवणे शक्य आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी पाणथळ, नदी-नाले काठावरील जमिनीत सोयाबीन लागवड सरी वरंबा, ‘बीबीएफ’ टोकण यंत्राच्या साह्याने करावी, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.

जिल्ह्यात सोयाबीनची २०२० मध्‍ये १७६१ किलो प्रति हेक्‍टरी, २०२१ मध्‍ये १६४१.४० किलो व २०२२ मध्‍ये १३८१.०८ किलो प्रति हेक्‍टरी उत्पादन झालेले आहे. यापूर्वीचे सोयाबीनचे उत्‍पादन पाहता यामध्‍ये वाढ करणे सहज शक्‍य आहे.

गेल्या हंगामात ३६२२ शेतकऱ्यांच्‍या ३ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर घेण्‍यात आलेल्‍या सोयाबीन पिकाच्‍या प्रात्‍यक्षिकात शेतकऱ्यांनी वापरलेल्‍या एसओपी व टोकण पद्धतीने लागवड केलेल्‍या शेतकऱ्यांच्‍या उत्‍पादनात २०२१-२२ मधील पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्‍या सोयाबीन पिकाच्‍या उत्‍पादनात ५३.८३ टक्‍क्‍यांनी व २०२२-२३ मधील पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्‍या सोयाबीन पिकाच्‍या उत्‍पादनात ४४.६८ टक्‍के वाढ झाल्‍याचे दिसून आले आहे.

BBF Soybean
Soybean Market : हिंगोली बाजार समितीत सोयाबीन ४५०० ते ४८९५ रुपये

मागील वर्षी पाणथळ, नदी नाला काठावरील जमिनीत ज्‍या शेतकऱ्यांनी सरी वरंब्‍यावर टोकण पद्धतीने लागवड केली, अशा शेतकऱ्यांना अतिवृष्‍टी होऊनही उत्‍पादन चांगले आलेले आहे.

त्‍यामुळे सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांनी पाणथळ, नदी नाल्‍याच्‍या काठच्‍या जमिनी, पाणी साचणाऱ्या जमिनीत सरीवरंबा पद्धत किंवा बीबीएफ यंत्राद्वारे टोकण पद्धतीने पेरणी करावी. या पद्धतीने पेरणी केल्‍यास एकरी १६ ते २२ किलो बियाणे लागत असल्‍यामुळे बियाण्‍याची २५ ते ५० टक्‍के बचत होऊन बियाण्‍यावरील खर्च कमी होतो.

उत्पादकता कमी होण्याची कारणे

- हलक्‍या जमिनीत सोयाबीन पीक घेणे

- वाणाची निवड जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे न करणे

- घरगुती बियाणे प्रतवारी न करता वापरणे

- पेरणीपूर्वी उगवणशक्‍तीची खात्री न करणे

- बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीजप्रक्रिया न करणे

- पेरणी ५ सेंटिमीटरपेक्षा जास्‍त खोलीवर करणे

- शिफारशीप्रमाणे रासायनिक खत न वापरणे

- हेक्‍टरी रोप संख्‍या योग्‍य न ठेवणे व पारंपरिक पद्धतीने बहुपीक पेरणी यंत्राने पेरणी करणे

BBF Soybean
Incentive Subsidy : प्रोत्साहनपर अनुदानासाठी ३१ हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

नागठाणा येथे २०० एकरांवर बेड नियोजन

बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्‍यास आंतर मशागतीची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात. आगामी खरीप हंगामामध्‍ये सोयाबीनची टोकण पद्धतीने लागवड करण्‍यासाठी मौजे नागठाणा तालुका वाशीम येथे आतापर्यंत ७० एकर क्षेत्रावर बेड तयार करण्‍यात आले आहे.

२०० एकरांपर्यंत बेड तयार करण्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील इतर गावांतील शेतकऱ्यांनीही पेरणीपूर्वी सरी वरंबे तयार करून ठेवावे, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com