Kharif Season: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन व भुईमूग पिकांची चांगली उगवण होण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे अत्यावश्यक आहे. उगवण क्षमता निश्चित करूनच पेरणी केल्यास उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते, असे मत सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी यांनी व्यक्त केले..जुना पद्माळे येथील शेतकरी प्रदीप पाटील यांच्या शेतात कृषि विभागातर्फे बीज प्रात्यक्षिके व बियाणे उगवण क्षमता तपासणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला उपकृषि अधिकारी प्रदीप माळी, सहाय्यक कृषी अधिकारी दिलीप मिरेकर, प्रदीप पाटील, शिवाजी चौगुले,.Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?.जयवंत पाटील, प्रमोद पाटील, अंजुम महात, प्रकाश पाटील, दिलीप बोळाज यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. .Soybean New Variety: सोयाबीनच्या एमएयूएस-७२५ वाणाची ‘वनामकृवि’च्या नावे नोंदणी.श्री. सूर्यवंशी म्हणाले, की सोयाबीन किंवा भुईमूग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बीज प्रात्यक्षिक करू शकतात. उगवण क्षमतेच्या चाचणीमुळे बियाण्यांची गुणवत्ता लक्षात येते..यावेळी त्यांनी उगवण क्षमता तपासण्याची पद्धतही समजावून सांगितली. यामध्ये १०० बियाण्यांची चाचणी घेऊन त्यापैकी किमान ७० बियाण्यांना कोंब फुटल्यास ते बियाणे पेरणीस योग्य समजावे, असे त्यांनी सांगितले. कमी उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर टाळल्यास दुबार पेरणीचा खर्च आणि उत्पादनातील नुकसान कमी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.