Pune News: अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. पण बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा जवळपास १५०० रुपये कमी भाव मिळत आहे. सरकारने दिवाळीच्या आधीच खरेदी सुरू करणे अपेक्षित असताना सरकार मात्र अजूनही नियोजनच करत आहे. ऐनवेळी पणन मंडळाला नोडल एजन्सीचा दर्जा देऊन खरेदीची नव्याने घडी बसवली जात आहे. मात्र या गोंधळात खरेदीला उशीर होत आहे. .राज्यातच नव्हे तर देशात सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा १५०० रुपयांपर्यंत कमी आहे. आजही सोयाबीन ३ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. देशातील सोयाबीन उत्पादनात यंदा १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आल्याने चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा होती..मात्र, मध्य प्रेदश सरकारच्या भावांतर योजनेमुळे शेतकरी सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक चांगली सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात उत्पादन वाढीच्या अंदाजाने भाव दबावात असल्यामुळे देशात सध्या भाव कमी आहेत. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनसाठी प्रति क्विंटल सरासरी ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजारभाव कमी आहेत..Soybean MSP Procurement: राज्यात १० लाख टन सोयाबीन खरेदी होणार? राज्याने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव.यंदा उत्पादनात घट झाल्याने आधीच मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच भाव कमी असल्याने दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. मात्र राज्यात अजूनही खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. हमीभाव खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे..ऐनवेळी सुधारणांचा घाटसोयाबीनची खरेदी दिवाळीच्या आधी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. खरेदी सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर तयारीही सुरू होती. ७ ऑक्टोबर रोजी खरेदीच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली आणि यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला नोडल एजन्सीचा दर्जा देऊन बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदी केंद्रे देण्याचा अधिकार देण्यात आला. या संबंधिचे पत्र १५ ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. .त्यामुळे बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत हमीभावाने खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ या नोडल एजन्सींची कोंडी झाली. या दोन्ही नोडल एजन्सींना केवळ अ आणि ब वर्गाच्या सहकारी संस्थांनाच खरेदी केंद्रे देण्याचा अधिकार दिला. ऐनवेळी हा सर्व बदल केल्याने खरेदी केंद्रांना नव्याने मान्यता तसेच सर्व घडी बसायला उशीर होत आहे. याच कारणामुळे राज्यात अद्याप हमीभावाने खरेदी सुरू झाली नाही, असे सर्व घडामोडी जवळून पाहणाऱ्या जाणकारांनी सांगितले..Soybean MSP: १० लाख टन सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला.मध्य प्रदेशात भावांतर योजनेतून खरेदी सुरूमध्य प्रदेश सरकारने यंदा सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना सुरू केली. खुल्या बाजारात सोयाबीन विकल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेला भाव आणि हमीभाव यातील फरक सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. भावांतरअंतर्गत खरेदीसाठी बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्रे देण्यात आली आहेत. .शुक्रवारपासून (ता. २४) शेतकरी या केंद्रावर सोयाबीन विकत आहेत. नोंदणी क्रमांक, पावती आणि आधार कार्ड असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारभावाने खरेदी होत आहे. त्यानंतर १५ दिवसांत या शेतकऱ्यांना भाव फरक मिळणार आहे. कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख केली जात आहे..३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २४) हमीभावाखाली सोयाबीन न विकण्याचे आवाहन केले. ‘सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३० पासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन त्यांनी केले..दहा लाख टन उद्दिष्टाची मागणीराज्य सरकारने केंद्राकडे १० लाख टन सोयाबीन खरेदीच्या उद्दिष्टाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आहे. आतापर्यंत केंद्राकडून मंजुरी मिळाली नाही. मात्र पुढील काही दिवसांमध्ये मंजुरी मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले..अतिवृष्टीने उत्पादन कमी झाले. २० क्विंटल सोयाबीन घरात पडून आहे. भाव ३५०० रुपये आहे. यात खर्चही निघत नाही. त्यामुळे सरकारने लवकर हमीभावाने खरेदी सुरू करावी. सुनील मेहेत्रे, शेतकरी, नसिराबाद, जि. बुलडाणा.सरकारने खरेदीची प्रक्रिया गुंतागुंतीची करून ठेवली आहे. ऐनवेळेला शेतकरी उत्पादक कंपन्या, इतर सहकारी संस्था आणि बाजार समित्यांमध्ये कृषी पणन मंडळाला खरेदी केंद्रे सुरू करण्याचे अधिकार दिले. तसेच दोन केंद्रांमधील हवाई अंतर किमान १० किलोमीटर आहे. त्यामुळे मार्केट फेडरेशची खरेदी केंद्रे बंद पडणार की कसे? तालुका खरेदी-विक्री केंद्र आतापर्यंत सरकारच्या खेरदीवर अलंबून असल्यामुळे बंद पडण्याचा निर्माण झाला आहे. सरकारने या सर्व धोक्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.नितीन हिवसे, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.