Chhatrapti Sambhajinagar News : सोयाबीनच्या कापणी बरोबरच मळणीनेही वेग पकडला असून उत्पादनात घट येते आहे. दुसरीकडे वाढलेल्या कापणी व मळणीच्या दराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. मराठवाड्यात जवळपास २५ लाख ५९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या ५ लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात पेरणी झालेल्या १९ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
माहितीनुसार, जालन्यात सोयाबीनच्या कापणीचे दर ३७०० ते ४५०० प्रती एकर दरम्यान आहेत. दुसरीकडे बीडच्या काही भागात ५ हजार रुपये प्रति एकरपर्यंत सोयाबीन कापणीचे दर राहिले.
लातूरच्या रेणापूर व औसा तालुक्यात सोयाबीनच्या कापणीचे दर ४००० ते ४५०० रुपये प्रति एकर दरम्यान आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मोहा परिसरात कापणीचे दर प्रति एकर ४००० ते ४५०० रुपये असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. भागनिहाय गतवर्षीच्या तुलनेत ५०० ते १००० रुपये प्रति एकर कापणीचे दर वाढले.
रब्बीची आशा नसल्याने जनावरांच्या चाऱ्याच्या सोयीसाठी सोयाबीनचे भुस उपलब्ध व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी हार्वेस्टरने सोयाबीन काढणे ऐवजी मजुरांकडूनच कापणी करून सोयाबीन काढणीला पसंती दिल्याचे स्थिती आहे.
एकीकडे कापणीचे दर वाढलेले असतानाच मळणीच्या दरालाही १५० रुपये प्रति कट्टा तर क्विंटलला ३०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. मजूर मिळत नाही महिला मजुराला दिवसाला ४०० ते ५०० रुपये तर पुरुष मजुराला ५०० ते ६०० रुपये मजुरी मोजावी लागत असल्याची माहिती ही शेतकऱ्यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.