Akola News: राज्यात ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या वतीने सुरू असलेल्या एकूण ५८४ खरेदी केंद्रांवर आतापर्यंत केवळ साडेतीन लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. गतवर्षी एकूण ११.२१ लाख टन सोयाबीन खरेदी केली होती. त्या तुलनेत अपेक्षित गतीने खरेदी पुढे जात नसल्याचे कृषी बाजारपेठेतील तज्ज्ञांचे मत आहे. .शासनाने राज्यात ४५२ खरेदी केंद्रे कार्यान्वित केली आहेत. यापैकी ‘नाफेड’अंतर्गत महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी बोर्ड आणि ‘नाफेड’ची स्वतःची केंद्रे समाविष्ट आहेत..Soybean Crisis: मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांचे २९२ कोटींचे नुकसान.‘नाफेड’च्या आकडेवारीनुसार, आजवर ३ लाख २७ हजार ४५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १४ हजार शेतकऱ्यांकडून ३ लाख २१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक खरेदी राज्य सहकारी बोर्डाच्या १५७ केंद्रांवर झाली असून, येथे एकूण १ लाख ९३ हजार ५४३ क्विंटल सोयाबीन विक्री झाली आहे..विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या ३६ केंद्रांवर ५६ हजार ३०६ क्विंटल, तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या १९० केंद्रांवर ५५ हजार २७१ क्विंटल सोयाबीनची नोंद झाली आहे. ‘नाफेड’च्या एका केंद्रावरही १३,८५८ क्विंटल खरेदी पार पडली आहे..Soybean Procurement: बीड जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी .दरम्यान, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) देखील हमीभावाने खरेदी करत असून राज्यातील प्राथमिक कृषी पतसंस्था, बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी आहेत. शेतकऱ्यांची गर्दी, तांत्रिक अडचणी, ऑनलाइन प्रक्रियेतील विलंब अशा कारणांमुळे अनेक भागात खरेदी संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे..सोयाबीन खरेदीचा आढावाएजन्सी केंद्रे खरेदी (क्विंटल)विदर्भ मार्केटिंग ३६ ५६३०६राज्य सहकारी बोर्ड १५७ १९३५४३राज्य कृषी पणन मंडळ १९० ५५२७१नाफेड १ १३८५८एनसीसीएफ ३२ २७५२१एकूण ४५२ ३४८५३३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.