Nagpur News: सोयाबीन खरेदीत लूट सुरू आहे, बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्रे बंद आहेत. खरेदी केंद्र देताना अधिकारी लाच घेतात, असा आरोप करीत विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना घेरले. खुल्या बाजारात सोयाबीन तीन ते साडेतीन हजार रुपयांनी विकत आहे. केवळ लांब धाग्याचा कापूस खरेदी केंद्रांवर घेतला जात आहे, असे असताना विचारलेल्या प्रश्नांना चुकीचे उत्तर देता, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे, अशी थेट टीकाही सदस्यांनी केली..ज्याप्रमाणे मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना महाराष्ट्राने घेतली, तशीच मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनसाठी राबविलेली भावांतर योजना घ्यावी, असे आव्हान शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी दिले. रावल यांनी निकषाप्रमाणे खरेदी सुरू असल्याचे सांगत चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक सदस्यांनी जोरदार हल्लाबोल करीत गोंधळ घातला. प्रश्नोत्तराच्या तासाला तब्बल २९ मिनिटे या प्रश्नावर चर्चा झाली. अन्य प्रश्नांना न्याय देण्यासाठी या प्रश्नी अध्यक्षांनी दालनात बैठक बोलविली. मात्र आक्रमक विरोधकांनी सभात्याग केला. .MSP Procurement: कापूस, सोयाबीन, मका हमीभावाने खरेदी सुरू.भाजपच्या संतोष दानवे यांच्यासह अन्य सदस्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत, हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी केले जात असल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. तसेच अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले आहे. तरीही कापूस खरेदी केंद्रे नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सोयाबीन, कापूस खरेदी केंद्रे सुरू असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी सुरू नसल्याचे उत्तरात सांगितले. या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. .विजय वडेट्टीवार म्हणाले, की हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहेत. केवळ लांब धाग्याचा कापूस खरेदी केंद्रावर घेतला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांवर सोयाबीन घेत नाहीत, खुल्या बाजारात साडेतीन चार हजाराने सोयाबीन विकले जात असताना तुमचे डोळे फुटले आहेत का? असा जळजळीत सवाल केला. तसेच हमीभावाने कुठे खरेदी सुरू आहे हे दाखवा, असे आव्हान दिले. तसेच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरसकट खरेदी करावी, अशी मागणी केली. .MSP Procurement: सोयाबीन, मूग, उडदाच्या खरेदीसाठी सात हमीभाव केंद्रे.यावर पणनमंत्री रावल यांनी मागील वेळी १२४ केंद्रे होती, आता १६८ केंद्रांपैकी १५६ केंद्र कार्यान्वित असल्याचे सांगत आहेत. केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत त्यानुसार जिल्हानिहाय निकषाप्रमाणे खरेदी सुरू आहेत. एका बाजूला नुकसानीपोटी विमा मागणी आणि दुसरीकडे जास्त उत्पादन अशी परिस्थिती असेल तर विरोधाभास निर्माण होतो, असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तसेच १२० कोटी रुपये ‘एनसीसीएफ’ आणि ‘नाफेड’ला आगाऊ दिले आहेत. त्यातून बारदाना खरेदी केला आहे. .२० पैकी १२ केंद्रे बारदान्याअभावी बंद सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावात खरेदी केले जात नाही, असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. असे उत्तर देण्याआधी परिस्थितीचा विचार करावा. ३५०० रु. सोयाबीन विकले जात असताना उत्तर देण्याआधी मंत्र्यांनी विचार करावा. खोटे बोलत असाल तर फसवणूक कुणाची करताय? असा सवाल कैलास पाटील यांनी केला. धाराशिवमधील २० पैकी १२ केंद्रे बारदान्याअभावी बंद आहेत. बारदाना नाही म्हणून केंद्रे बंद करायचे, नोंदणी उशिरा करायची ही एसओपी सध्या सुरू आहे. .MSP Procurement: सोयाबीन, मूग, उडदाच्या खरेदीसाठी सात हमीभाव केंद्रे.मंत्र्यांना काहीही कळत नाही : सोळंके‘राष्ट्रवादी’च्या प्रकाश सोळंके यांनी ‘‘पणनमंत्र्यांना काही कळत नाही,’’ अशा शब्दांत फटकारले. ‘‘खरेदी केंद्रे कधी सुरू करता? ६७ हजार क्विंटल सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केले. ‘नाफेड’चे माजलगावला एकही केंद्र सुरू झालेले नाही. गेल्या वर्षी खासगी व्यापाऱ्यांनी ३ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केले. ‘नाफेड’ने १७ हजार क्विंटलने खरेदी केले. तुम्ही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी खरेदी केंद्र सुरू केले आहे. .बैठकीतही वादळी चर्चा ही चर्चा लांबल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत या प्रश्नावर दीर्घकाळ चर्चा केली. अन्य विषयांच्या प्रश्नांनाही न्याय द्यायचा आहे. त्यामुळे माझ्या दालनात बैठक लावतो. तेथे चर्चा करू तेथील चर्चाही रेकॉर्डवर घेऊ, असे सांगितले. मात्र विरोधक आक्रमक झाले. पटोले यांनी प्रश्न व उत्तर वाचून दाखवत दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. यावर राजकारण करता येणार नाही. सरकार बोथट झाले असेल तर हा प्रश्न राखून ठेवा, अशी मागणी केली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप करत दालनातील बैठकीचा आग्रह धरला. मात्र विरोधकांनी मागणी लावून धरत सभात्याग केला. दरम्यान बैठकीतही वादळी चर्चा झाली. तसेच तांत्रिक मुद्दे उपस्थित करत पणनमंत्री रावल यांनी चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला..खरेदी केंद्रांसाठी चार लाखांची मागणी : लोणीकरभाजपच्या बबनराव लोणीकर म्हणाले, की सोयाबीन खरेदी केंद्राचे प्रस्ताव डीएमओच्या माध्यमातून पाठवले आहेत. त्यांना मान्यता देण्यासाठी ४ लाख रुपये अधिकारी मागत आहेत. बाजारात व्यापारी लुटत आहेत, असा गंभीर आरोप केला. तसेच हमीभाव खरेदी केंद्रांचे प्रस्ताव मान्य करणार का? ‘सीसीआय’चे एक कापूस खरेदी केंद्र १५० ऐवजी ते ५० गावांसाठी करावे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.