Mumbai News: यंदाच्या खरिपातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी गुरुवारपासून (ता. ३०) नोंदणी सुरू होणार असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली. तसेच बारदान्याअभावी फजित होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेतली आहे. पणन महामंडळ बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविणार असून यंदा तुटवडा भासणार नाही यासाठी आम्ही दक्ष आहोत, असेही ते म्हणाले..मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे, या सोयाबीनला जागतिक पातळीवर मागणी आहे. त्यामुळे येथे भावांतर योजना राबविण्याची गरज नाही. येथे उच्चांकी खरेदी होईल, असा दावाही मंत्री रावल यांनी केला..या वर्षी सोयाबीन १८ लाख ५० हजार टन, मूग ३ लाख ३० हजार आणि उडीद ३२ लाख ५६ हजार क्विंटल खरेदीसाठी केंद्र सरकारने मान्यता आहे.श्री. रावल म्हणाले, ‘‘मागील वर्षी महाराष्ट्रात ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी केली होती. यंदा महाराष्ट्रात ७५ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. आम्ही केंद्र सरकारकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता..Soybean Price: सोयाबीन दर दहा वर्षांपासून ‘जैसे थे’.पहिल्या टप्प्यासाठी १८ लाख ५० टन खरेदीस मान्यता दिली आहे. गरज भासल्यास आणखी खरेदीस मान्यता देण्यात येईल. मागील सोयाबीन खरेदीसाठी ५६५ खरेदी केंद्रे होती, यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येईल. खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या नोडल संस्थांच्या माध्यमातून सर्व शेतकरी उत्पादक संस्था ऑनलाइन प्रक्रियेद्वारे थेट खरेदी योजनेत सहभागी होऊ शकतात.’’.ॲप, पोर्टलवर नोंदणीसोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठी ॲप आणि पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी ॲपवर तारीख आणि वेळ नमूद करण्याची सोय आहे. त्यामुळे नोंद केलल्या वेळेला माल केंद्रावर घेऊन जावा, असे आवाहन श्री. रावल यांनी केले..Soybean Procurement: प्रक्रिया उद्योजकांकडूनच होते परवडणाऱ्या दरात सोयाबीन खरेदी.दक्षता पथक आणि तक्रार निवारणहमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करून तोच माल खरेदी केंद्रावर विकला जाण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर नजर ठेवण्यासाठी तसेच खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच जिल्हाधिकारी, उपनिबंधक, कृषी अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांचा समावेश असलेले दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. तालुकापातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक असेल..कापसासाठी ३ लाख ७५ हजार शेतकऱ्यांची नोंदणीहमीभावाने कापूस खरेदीसाठी कपास किसान अॅपद्वारे १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे ३.७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी १२४ खरेदी केंद्रे होती, यावर्षी ती वाढवून १७० करण्यात आली आहेत, अशी माहिती श्री. रावल यांनी दिली..तर राज्य सरकार खरेदीत उतरेल हमीभावाने खरेदीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मात्र, शेतीमाल जास्त आल्यास आणि खरेदीला विलंब झाल्यास राज्य सरकार खरेदीत उतरेल, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले. खरेदी प्रक्रियेत काम करणाऱ्या संस्थांना रीतसर कमिशन मिळत असते. त्यामुळे सेवा द्याव्यात. जेथे खरेदी होईल तेथे तक्रार निवारण अधिकारी नेमला पाहिजे, असेही ते म्हणाले. .ओलाव्यात सूट नाही मागील वर्षी १२ ऐवजी १५ टक्के ओलावा गृहीत धरून खरेदीचे आदेश दिले मात्र, ती खरेदी झाली नसल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. रावल म्हणाले, यंदा केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणेच खरेदी होईल. ओलाव्याची सवलत दिली तर माल खराब होण्याची शक्यता असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.