Dharashiva News: हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून तालुक्यात चार सोयाबीन खरेदी केंद्र सुरू आहेत. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र, बाजारात सोयाबीनच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक दर मिळू शकेल, अशी शक्यता असल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे खरेदी केंद्र ओस पडलेली दिसत आहेत. खुल्या बाजारात साधारण ५२ रुपये किलो दराने सोयाबीन खरेदी सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. .दरम्यान, हमीभाव केंद्रांमध्ये आतापर्यंत २ हजार २७ शेतकऱ्यांकडून ४७ हजार ७७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीपोटी २३ कोटी ३२ लाख ११ हजार ८८८ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांपासून खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत. मागील आठवड्यात ५२०० रुपये प्रतीक्विंटल दर होता. येत्या काही दिवसांत कमीत कमी ५५०० रुपये प्रतीक्विंटल दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरील सोयाबीनची आवक कमी झाली आहे..Soybean Prices: नांदेडमध्ये प्रक्रिया उद्योगांचे सोयाबीन दर ‘एमएसपी’नजीक .तालुक्यात खरीप हंगामात सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र, हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला. तरीही ज्या शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले, त्यांनी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नाफेडकडे विक्री करण्यास प्राधान्य दिले. नाफेडमार्फत तालुक्यातील चोराखळी, कळंब, शिराढोण, हासेगाव, पिंपळगाव (डोळा) ही चार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत..Soybean Price: सोयाबीन दर स्थिर; तसेच काय आहेत हरभरा, आले, हळद आणि संत्र्याचे आजचे बाजारभाव .५५०० पर्यंत भाव जाण्याची शक्यतातालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पाऊस सुरूच राहिल्यास हातातोंडाशी आलेला घासही जाईल, म्हणून शेतकऱ्यांनी लगबगीने बाजारपेठेत त्याची विक्री केली. सुरवातीला खासगी बाजारपेठेत सोयाबीनचे दर ३८०० ते ४२०० रुपये होते. हमीभाव ५३२८ रुपये असताना खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने सोयाबीन खरेदी केले. मात्र, आता खुल्या बाजारात सोयाबीन दराने उसळी घेतली आहे. येत्या काळात ५५०० रुपये प्रतीक्विंटल दर मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे..सध्या खुल्या बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार होत आहे. दर वाढतील या आशेने बहुतेक हमी केंद्रावर सोयाबीनची आवकच नाही. त्यामुळे खरेदी केंद्र बंद करण्याच्या मनःस्थितीत आहोत.- अभिलाष लोमटे, संचालक, एकता खरेदी केंद्र, कळंब.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.