Sangli News : जिल्ह्यात शेतकरी सोयाबीनची काढणी करून विक्री करू लागला आहे. मात्र ‘नाफेड’अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे हमीभाव केंद्र अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाच्या दरात सोयाबीनची विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. .त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे ९०० रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याने खरेदी केंद्रे लवकर सुरू करावी, अशी मागणी होवू लागली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रे कधी सुरू होण्याची प्रतीक्षा करू लागला आहे..जिल्ह्यात खरिपात सोयाबीनचा ३२ हजार २५१ हेक्टरवर पेरा झाला होता. मुळात यंदा पाऊस लवकर झाल्याने सोयाबीन पेरणीवर त्याचा परिणाम झाला असून सततच्या पावसाने काही प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, शासनाने हमीभाव जाहीर केला आहे. सोयाबीनला ५३२८, मुगासाठी ८७६८, तूर ८०००, भात २३६९, मका २४०० आणि उडीद ७८०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे..Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात?.‘नाफेड’अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे शिराळा आणि सांगली येथे हमीभाव केंद्र सुरू केले जाणार आहे. मार्केटिंग फेडरेशनने दोन केंद्राचे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर सादर केले आहेत. त्याचबरोबर पणन मंडळाच्या माध्यमातून यंदापासून सोयाबीन, भात, उडीद, तूर मका या पिकांची हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात सांगली, आटपाडी, शिराळा, विटा, पलूस आणि इस्लामपूर या बाजार समित्या खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, असे पणन मंडळाला सांगितले आहेत..Soybean Price: हमीभावापेक्षा ११२८ ते १७२८ रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी.दरम्यान, शासनाने पणन मंडळाला या बाबत आदेश दिले नाहीत. शासनाने आदेश दिल्यानंतर या बाजार समित्यांकडून खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले जातील. त्यानंतर हे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जाणार असून त्यावर मंजुरी मिळेल. त्यानंतर खरेदी केंद्र सुरू होणार आहेत..हमीभावापेक्षा कमी दरसांगली जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीला गती आली आहे. खरेदी केंद्रे सुरू नसल्याने शेतकरी बाजारात सोयाबीन विक्री करू लागला आहे. सोयाबीनचा ओलावा १० ते १२ टक्क्याला प्रति क्विंटल सरासरी ४३०० रुपये असा दर बाजारात मिळत आहे. .त्यामुळे हमीभावापेक्षा सरासरी ९०० रुपये दर कमी मिळत आहे. त्यातच सोयाबीनचा ओलावा (आर्द्रता) वाढली तर प्रति किलोचा दरात कपात करून ते पैसे शेतकऱ्यांना मिळतात. सोयाबीन विक्रीचा हंगाम संपल्यावर खरेदी केंद्र सुरु करणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.