Agriculture Sowing : लातुरात दोनशे हेक्टरवर होणार भरडधान्यांची पेरणी

Millet Production : मिलेट, अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून, जिल्ह्यात या भरडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : मिलेट, अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून, जिल्ह्यात या भरडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात दोनशे हेक्टरवर भरडधान्य पिकाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, मंगळवारी (ता. १८) पटेल आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोदगा (ता. औसा) येथे पेरणीला सुरुवात करण्यात आली. या वेळी बचत गटांच्या महिलांनी भरडधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचाही आस्वादही त्यांनी घेतला.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भारत सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, डॉ. शेषेराव मोहिते यांच्यासह भरडधान्य पेरणी करणारे शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांचा बांबूपासून बनविले पेन, टूथब्रश आणि टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला.

Agriculture Sowing
Kharif Sowing : खरीप पेरण्या सुरू, पण हमीभावाचा पत्ता नाही

अभियानात लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भरडधान्य पेरणीसाठी तयारी दाखवली आहे. आरोग्यदायी जीवनासाठी आहारात तृणधान्याचा समावेश आवश्यक आहे. तृणधान्यात कॅल्शिअम, लोह आणि प्रथिनांचे उच्च प्रमाण असून, कमी ग्लायसेमिक इंडेक्स तसेच मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबरचा समावेश आहे.

तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जिल्ह्यात त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासह उत्पादित भरडधान्याला बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे. लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनकडून भरडधान्याचे चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : गेवराईत ६० टक्के पेरा; यंदा कपाशीला प्राधान्य

भरडधान्य पिकांसाठी कमी पाणी लागते, तसेच ८० ते ९० दिवसांत पिके घेतली जातात. जिल्ह्यातील पर्जन्यमान लक्षात घेता भरडधान्य लागवड फायदेशीर ठरणार असल्याचे पटेल यांनी या वेळी सांगितले. भरडधान्याचा आहारातील समावेश ही काळाची गरज असून ही धान्ये आरोग्यासाठी हितकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, राळे आदी भरडधान्यांची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केली. बचत गटांच्या माध्यमातून मिलेटपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची विक्री वाढविण्यासाठी जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com