Ahilyanagar News: कांदा बियाण्यातील संशोधक शेतकरी, कृषिरत्न बाबासाहेब पिसोरे यांनी विकसित केलेल्या ‘सोना ४०’ या कांदा वाणाला केंद्र सरकारने शेतकरी संशोधित वाण म्हणून मान्यता दिली आहे. नुकतेच त्या संदर्भात पत्र पिसोरे यांना प्राप्त झाले असून, त्यांच्या पंचवीस वर्षांच्या कांदा बियाण्यांवरील संशोधनाचे चीज झाल्याची भावना व्यक्त होत आहे..दौला वडगाव (ता. आष्टी) येथील बाबासाहेब पिसोरे पस्तीस वर्षांपासून डोंगराळ भागातील, माळरानावरील शेती विकसित करून शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. ते साधारण २५ वर्षांपासून कांदा बियाण्यांचे उत्पादन करत असून, सातत्याने संशोधन करत आहेत. त्यांनी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कांदा व लसूण संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध वाणांच्या अभ्यासातून निवड पद्धतीने वाण विकसित केला. २००७ मध्ये ‘सोना ४०’ विकसित केलेल्या या वाणाचे ते आजतागायत उत्पादन घेत आहेत..Onion Production: उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याचा परतावा अपुरा.त्याच्या उत्पादकता आणि वैशिष्ट्यांमुळे या वाणाच्या कांदा बियाण्याला अहिल्यानगर, बीडसह राज्यभरातील शेतकऱ्यांकडून मागणी वाढत गेली आहे. ‘सोना ४०’ या वाणांच्या मान्यता व हक्क मिळण्यासाठी चार वर्षांपूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या वाण नोंदणी विभागाकडे अर्ज केला होता..Onion Crisis: कांदाप्रश्नी केंद्राचा हस्तक्षेप गरजेचा.त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिसोरे यांच्या शेताला भेट देत ‘सोना ४०’ या वाणाबाबत माहिती घेतली आणि ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या वाणाला मान्यता प्रमाणपत्र प्रदान केले आहे. त्यामुळे ‘सोना ४०’ या वाणासंदर्भात पिसोरे यांना उत्पादन आणि विक्रीसंदर्भात कायदेशीर हक्क आणि संरक्षण मिळाले आहेत. हे हक्क ५ डिसेंबर २०२५ पासून सहा वर्षासाठी असून, पुढे नुतनीकरणानंतर आणखी नऊ वर्षापर्यंत हक्क अबाधित राहू शकतात..‘सोना ४०’ कांदा वाणाची वैशिष्ट्येबाबासाहेब पिसोरे यांनी सांगितले, की पंचवीस वर्षांच्या अनुभवानुसार विकसित केलेल्या वाणांच्या कांद्याला दोन ते तीन पत्ती आहे. त्यामुळे नुकसान होत नाही. टिकवणक्षमता अधिक आहे. रोगाला कमी बळी पडतो. खरीप (पावसाळी) व रब्बी, लेट खरीप (हिवाळी-उन्हाळी) हंगामात घेता येतो. एका कांद्याचे वजन १०० ते १२५ ग्रॅमपर्यंत असते. पेरणी, रोपे लागवड व मल्चिंगवर लागवड करता येते. साधारणणे लागवड केली तर एकरी २५ टनांपर्यंत, तर मल्चिंगवर लागवड केल्यास एकरी ३५ टनांपर्यंत उत्पादन निघते. रंग चांगला असून, एकसारखा कांदा येत असल्याने निर्यातीसाठी उपयुक्त आहे. डेंगळा, गोल्टी, चिंगळी यांसारखी विकृती कांद्यात येत नाही..शेतकरी केवळ उत्पादन घेत नाही, तर तो संशोधनही करू शकतो. मी वेगवेगळ्या कांदा वाणांचे सुमारे २५ वर्षे संशोधन करून ‘सोना ४०’ हा वाण विकसित केला आहे. या वाणाला शासनाने मान्यता दिल्याने शेतकऱ्यांपर्यंत प्रसाराचा मार्ग मोकळा होणार आहे.बाबासाहेब पिसोरे, कांदा बीजोत्पादक व संशोधक शेतकरी, दौला वडगाव (ता. आष्टी) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.