डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे मागील भागामध्ये पारंपरिक शीतगृहांविषयी माहिती घेतली. या भागात सौर ऊर्जा आधारfत शीतगृह या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊ. .ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये शीतगृहासाठी लागणारी विद्युत ऊर्जा नियमित मिळण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे शीतगृह सौर ऊर्जेवर चालविण्याचे तंत्र अवलंबले जाते. त्याला सौर ऊर्जा आधारित शीतगृहे (SCS) म्हणतात. भारतासारख्या वर्षातील प्रदीर्घ काळ स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असलेल्या देशासाठी ते क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे. ती पर्यावरणासाठी अनुकूल असून, खर्चात बचत करणारी आहेत..Solar Cold Storage: शेतीमाल साठवणुकीसाठी सौर शीतगृह.कार्यप्रणालीया परकारच्या शीतगृहात सौर ऊर्जेचा वापर करून रेफ्रिजरेशन प्रणाली चालवली जाते.सौर पॅनेल : प्रामुख्याने छतावर सोलर पॅनेल बसवले जातात. त्यामुळे जागेमध्ये बचत होते. तसेच छतही कमी तापते. हे सौर पॅनेल सूर्यप्रकाशाचे रूपांतर विजेमध्ये करतात. प्रामुख्याने पॅनेलमध्ये ४ ते १२ किलोवॉट पॉवर क्षमतेचे सौर फोटोव्होल्टेइक (PV) ॲरे वापरले जातात. त्याची कमाल ऊर्जा खेचण्याची कार्यक्षमता (मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग -MPPT) ही ९९.५% पर्यंत असल्याने सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होतो.बॅटरी बॅकअप (इन्व्हर्टर) आणि कंट्रोलर : सौर पॅनेलमधून मिळवलेली वीज बॅटरीमध्ये साठवली जाते. यात कमी सूर्यप्रकाशातही कार्यक्षमतेने चालणारे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कॉम्प्रेसर वापरले जातात. त्याच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंग नियंत्रणासाठी कंट्रोलर बॅटरीचे नियंत्रित वापरले जाते..शीतकरण प्रणाली (रेफ्रिजरेशन युनिट) : बॅटरीमधील वीज रेफ्रिजरेशन युनिटला पुरवली जाऊन ते चेंबरमधील हवा थंड करते.उष्णता रोधन यंत्रणा (थर्मल इन्सुलेशन) : चेंबरच्या भिंती आणि छतावर १०० मिमी जाडीचा पॉली युरेथेन फोम (PUF) द्वारे थर्मल इन्सुलेशन केलेले असते.संपूर्ण प्रणाली नियंत्रित करणारा इलेक्ट्रॉनिक भागाला कंट्रोलर असे म्हणतात..Cold Storage: शेतीमाल साठवणीसाठी आधुनिक शीतगृह.ही प्रणाली दिवसा सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करून बॅटरी चार्ज करते. रात्री किंवा ढगाळ वातावरणातही साठवलेल्या विजेचा वापर करून काम करते.औष्णिक ऊर्जा साठवणयोग्य रचना : सौर ऊर्जा आधारित शीतगृहे रचनाच अशी केलेली असते की ते ३० तासांपर्यंत बॅटरीशिवायचा बॅकअप प्रदान करतात. काही प्रणाली ९६ तासांपर्यंत (४ दिवस) बॅकअप देऊ शकतात. यामुळे सूर्यप्रकाश नसतानाही (उदा. रात्री किंवा ढगाळ वातावरणात) शीतकरण सुरू ठेवता येते. त्यासाठी रासायनिक बॅटरी किंवा डिझेलची गरज राहत नाही..क्षमता : २ मे. टन, ५ मे. टन, आणि १० मे. टन क्षमतेच्या प्रणाली उपलब्ध असून, त्याचे संरचना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान मानकांनुसार आरेखित केलेली असते.तापमान श्रेणी : हे कक्ष ४ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राखण्यासाठी आरेखित केले जातात..Cold Storage Industry : विजेच्या वाढत्या दरामुळे कोल्डस्टोरेज उद्योग अडचणीत.ग्रामीण भागासाठी महत्त्वभारतातील ग्रामीण भागात विजेची उपलब्धता आणि स्थिरता ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे पारंपरिक शीतगृहे ग्रामीण भागात व्यवहार्य ठरत नाहीत. अशा स्थितीत सौर ऊर्जा आधारित शीतगृहे या समस्येवर थेट उपाय ठरतात. ही प्रणाली शेतकऱ्यांच्या शेतातच प्री-कूलिंग सुविधा उपलब्ध करून देते. त्यांचा प्रति किलो खर्च १.५ रुपयांपर्यंत कमी होतो.हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असून, पर्यावरण अनुकूल आहे. त्यामुळे कार्बन आणि हरितगृह उत्सर्जन कमी होते..फायदेएकदा उभारणी केल्यावर चालवण्याचा खर्च नगण्य असतो.कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने पर्यावरणपूरक ठरते.कोणत्याही वीज ग्रीडवर अवलंबून नसल्याने ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.शेतीमालाची नासाडी टाळून ती होते: फळे आणि भाजीपाला दीर्घकाळ ताजे राहतात..Cold Storage : शीतगृहांना आकारलेला वाढीव वीजदर मागे घ्यावा.तोटेप्रारंभिक गुंतवणूक खूप जास्त असते.सूर्यप्रकाशावर अवलंबून असल्याने ज्या भागात दीर्घकाळ वातावरण ढगाळ राहते. अशी ठिकाणी बॅटऱ्या पुरेशी चार्ज होत नाहीत.बॅकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्यांची कार्यक्षमता आणि आयुष्यमान मर्यादित असते. त्यांची वेळोवेळी देखभाल करावी लागते..काय करावे?सौर पॅनेल नियमितपणे स्वच्छ करावेत.बॅटरीतील ॲसिड व रसायनाच्या पातळीची वेळोवेळी तपासणी करून ते भरणे.चांगल्या दर्जाची उपकरणे, भाग वापरण्यावर भर द्यावा..काय करू नये?क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन साठवू नये.खराब किंवा सडलेले पदार्थ साठवणुकीसाठी ठेवू नयेत.अकुशल व्यक्तीकडून दुरुस्ती, देखभाल करू नका..उपयोगसौर ऊर्जा शीतगृहे प्रामुख्याने ग्रामीण भागात जिथे वीजपुरवठा अनियमित असतो किंवा उपलब्ध नसलेल्या शेतावर वापरता येतात. ही शीतगृहे शेतकरी, लहान व्यापारी आणि कृषी सहकारी संस्थांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांना टोमॅटो, कांदे, बटाटे, आंबा आणि इतर फळे व भाजीपाला साठवून ठेवता येतो.- डॉ. विक्रम कड ०७५८८०२४६९७(कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.