Pomegranate Export: समुद्रमार्गे सोलापूरचे डाळिंब पोहोचले ऑस्ट्रेलियाला

India-Australia Trade: सोलापूर जिल्ह्यातील उच्च गुणवत्तेच्या भगवा डाळिंबाची पहिलीच व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरीत्या ऑस्ट्रेलियात पोहोचली आहे. तब्बल ३९ दिवसांचा प्रवास पूर्ण करत या डाळिंबांनी ब्रिस्बेन आणि सिडनीच्या बाजारपेठेत स्थान मिळवले आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Solapur News: समुद्रमार्गे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब ऑस्ट्रेलियात पोहोचले. पहिल्या टप्प्यात सुमारे ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा पद्धतीने एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. तब्बल ३९ दिवसांचा प्रवास (सव्वा महिना) या डाळिंबाने केला. भगव्या वाणाचे हे गुणवत्तापूर्ण डाळिंब ऑस्ट्रेलियन ग्राहकांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे. या प्रयोगामुळे डाळिंबाला भविष्यात ऑस्ट्रेलियाची मोठी बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपेडाच्या पुढाकाराने अ‍ॅग्रोस्टार आणि के. बी. एक्स्पोर्ट्‌सच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून डाळिंबाच्या भगव्या वाणाची उच्चतम अशा गुणवत्तेच्या पहिल्या प्रतीच्या डाळिंबाची पहिलीच व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. समुद्रमार्गे वाहतुकीचा डाळिंबामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला.

Pomegranate
Grape, Pomegranate Market : सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव; दरही टिकून

डिसेंबरमध्ये पाठवण्यात आलेली आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रवासानंतर पहिली शिपमेंट ६ जानेवारी २०२५ ला ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनला आणि दुसरी शिपमेंट १३ जानेवारी २०२५ ला सिडनीला पोहोचली. पहिल्या शिपमेंटमधील ५.७ टन डाळिंब १,९०० पेट्यांमध्ये पॅक केले गेले. तर दुसऱ्या शिपमेंटमधील ६.५६ टन डाळिंब १,८७२ पेट्यांमध्ये ठेवण्यात आली. प्रत्येक पेटीमध्ये ३ किलो प्रीमियम फळे ठेवण्यात आली होती. अनुक्रमे ब्रिस्बेन आणि सिडनीच्या बाजारात या डाळिंबाची विक्री झाली. विशेषकरून

डाळिंबाचे वजन, आकारमान, भगव्या

आकर्षक रंगासह गोड, रुचकर चव आणि आरोग्यदायी महत्त्व या गुणवैशिष्ट्यांमुळे हे डाळिंब तिथल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.

समुद्रमार्गे वाहतुकीचा पहिलाच प्रयोग यशस्वी

तब्बल ३९ दिवसांचा ‘शिपमेंट’चा प्रवास

भारताला ऑस्ट्रेलियन बाजारपेठेची संधी

Pomegranate
Pomegranate Center : डाळिंब केंद्राकडून उपेक्षित, गरजू शेतकऱ्यांना मदत

समुद्रमार्गे कमी खर्च

ऑस्ट्रेलियात भारतीय डाळिंबाच्या निर्यातीसाठी मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये कृती आराखडा आखण्यात आला होता. त्यानुसार तिथल्या यंत्रणेशी करार करण्यात आला. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये पहिल्यांदा हवाईमार्गे एक खेप पाठवण्यात आली. परंतु पुढे वाढती मागणी आणि कमी खर्चामुळे समुद्री मार्गे वाहतुकीचा पर्याय वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही आता यश मिळाले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची मोठी बाजारपेठ डाळिंबाला मिळणार आहे.

फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे वाढ होत आहे, सध्या २९ टक्क्यांपर्यंत फळांची निर्यात होत आहे. त्यात डाळिंबाची निर्यातही जवळपास २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, याचा विचार करता डाळिंबाला मोठी संधी आहे. त्याचसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, त्यातूनच आता ऑस्ट्रेलियाची मोठी बाजारपेठ मिळाली आहे.
अभिषेक देव, अध्यक्ष, अपेडा, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com