Solapur Zilla Parishad : सोलापूर जिल्हा परिषदेकडून कृषी अवजारांसाठी तब्बल ४.५५ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
Solapur News : सोलापूर शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात कृषी साहित्य व अवजारे वाटपाचे मोठे नियोजन केले आहे. याअंतर्गत चार प्रमुख योजनांच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी ५५ लाख ४५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ३,२८४ पात्र शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्याचा लाभ मिळणार आहे.
Solapur Zilla Parishad agriculture department DBT schemeAgrowon