Sugarcane FRP Demand: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माळशिरसमध्ये ऊसदर आंदोलन पेटले आहे. उसाला पहिली उचल प्रति टन ५ हजार रुपये मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच ऊसदर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या १५ ट्रॅक्टरचे टायर फोडले..शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साळमुख आणि वेळापूर येथे ४ साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. यामुळे उसाने भरलेले १५ ट्रॅक्टर थांबले आहेत. ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पण त्यांच्या पाच हजारांच्या मागणीची कारखानदारांनी दखल घेतलेली नाही. येथील कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. ग्रामीण भागात ऊसतोड सुरु झालेल्या आहे. ऊस तोड आणि ऊस वाहतूक रोखण्यासाठी शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे..Mahagaon Sugarcane Harvesting : महागाव परिसरात हार्वेस्टरने ऊसतोड सुरू.महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. चालू वर्षी उसाला प्रति टन ५ हजार रूपये पहिली उचल मिळावी. साखरेचे किमान विक्री मुल्य प्रति कलो ५० रूपये आणि सी हेव्ही इथेनॅालचा दर प्रति लिटर ७० रूपये करा तसेच शेतकऱ्यांना अनुदान देण्याची त्यांची मागणी आहे. कर्नाटकातील हत्तरगी टोल नाका ते हुबळीपर्यंत लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा सुरू आहे. .Sugarcane Weight Loss Issue: उसाचे वजन घटतेय; कारखाने बंद पाडू नका; साखर संघाचे राजू शेट्टी यांना विनंती पत्र.खते, किडनाशके, बियाणे महागली असून, मशागतीचा खर्चही वाढला आहे. केंद्र, राज्य सरकार व साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. .आज मुख्यमंत्र्यांशी चर्चादरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. ऊस दरासह उपसाबंदी, कोयना धरणातील वीजनिर्मिती बंद करून शेतीसाठी पाणीवाटप करा या व अन्य विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.