Sugarcane Farmers Protest: सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली. शेतकरी संघटना सुरुवातीला पहिली उचल प्रतिटन ३,५०० रुपयांवर ठाम होते. पण कारखानदार ३,१५० रुपयांहून अधिक दर देण्यास तयार नाहीत. यावर कारखानदारांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. .ऊसदर प्रश्नी आज (दि. १९ नोव्हेंबर) कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार होती. पण ही बैठक अचानक बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे..Maharashtra Sugarcane Rates: महाराष्ट्रातील ऊसदराने कर्नाटकची कोंडी; सीमाभागातील ऊस कारखान्यांकडे वळला.सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. ही बैठक आज सकाळी ११ वाजता होणार होती. पण या बैठकीला राजू शेट्टी उपस्थित राहू नयेत म्हणून कारखानदारांच्या दबावाखाली काल रात्री बैठक घेण्यात आली, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे..या बैठकीत तासभर चर्चा झाल्यानंतर कारखानदार ३,१५० रुपयांहून अधिक दर द्यायला तयार नाहीत. पहिली उचल ३,५०० रुपये देण्याची आमची मागणी आहे. आम्ही लवचिक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही ३,३०० रुपये अधिक २०० रुपयांवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. पण प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला की, ३,२५० रुपये अधिक २०० रुपये दर निश्चित करुन आदेश काढला जाईल. पण कारखानदारांनी हा दर मान्य केलेला नाही, असे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. .Sugarcane FRP Challenges: ‘एफआरपी’चे फसवे गणित.दरम्यान, शेतकरी संघटनांनी २२ तारखेपर्यंत थांबण्याची तयारी दर्शवली आहे. तोपर्यंत तोडगा निघाला नाही तर सोलापूर शहराला जोडणारे सर्व महामार्ग आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कारखानदार जाणुनबुजून आडमुठी भूमिका घेत आहेत. जर कारखाने अधिक दिवस बंद राहिले तर शेतकऱ्यांचा ऊस वाळून जाईल. हाच कारखानदारांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे..कारखानदारांनी दोन दिवसांचा वेळ मागितला- पालकमंत्री गोरेयाबाबत बोलताना पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, शेतकरी आणि कारखानदार हे एका रथाची दोन चाके आहेत. ही बरोबरीने चालली पाहिजे. कारखाने चालले पाहिजेत आणि उसाला दरही मिळायला हवा. शेतकरी संघटनेने त्यांची भूमिका ठामपणे मांडली आहे. कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. .सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा आणि ऊसदराचा प्रश्न सामंजस्याने मार्गी लागावा, यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांची बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत त्यांच्या भूमिका, अडचणी आणि अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. ऊसदराच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही घटकावर अन्याय होऊ न देता चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गोरे यांनी म्हटले आहे. .धाराशिव जिल्ह्यातही ऊसदराचा तिढा कायमधाराशिव जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. उसाला पहिली उचल प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्याची मागणी आहे. पण कारखानदारांनी यावर सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.