
Solapur News : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन पीकासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मूल्य साखळी भागीदार (VCP) यांचे मार्फत संपूर्ण जिल्हातील कार्यक्षेत्रात समुहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा इ. घटक राबवायचे आहेत. याकरिता शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था यांची निवड करावयाची आहे. त्यांना यासाठी आवाहन कऱण्यात आले आहे.
मूल्य साखळी भागीदार (VCP) म्हणून निवड करावयाच्या शेतकरी उत्पादक कंपनीकरिता पुढील प्रमाणे पात्रता निकष असणार आहेत. यामध्ये कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. ज्या जिल्हात समूह तयार झाला आहे, तेथे काम करण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा, म्हणजेच नोंदणी माहे मार्च २०२२ पूर्वीचा असावा.
किमान २०० शेतकरी, उत्पादक कंपनी मध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्यिष्टामध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमुद असावे. मागील ३ वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रूपयापेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा सहभाग असावा.
शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यामध्ये कार्यरत असावी. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाणार आहे.
१० हजार शेतकरी उत्पादक संघ योजनेअंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी, NAFED NSC-OS इत्यादी सार्वजनिक संस्थाकडे नोंदणीकृत तेलबियाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी यांना वरील पात्रता निकषाच्या पूर्ततेच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून वरील निकषांचे पुर्तता करणाऱ्या इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्थांनी १४ मेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.