Solapur Grape Vine Losses: द्राक्षघड चांगले, पण बागा जगवायच्या कशा? दुष्काळाच्या झळांनी पाणीपातळी खालावल्याने द्राक्ष बागायतदारांसमोर हा प्रश्न उभा ठाकला आहे. ऑक्टोबर छाटणीची ५० टक्के कामे पूर्ण झाली असून, प्रयोगशाळेतील तपासणीत काड्यांमध्ये सरासरी ९० टक्के घड आढळले आहेत. मात्र, पिकाची स्थिती समाधानकारक असतानाही डिसेंबरनंतर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. .त्यामुळे हंगामातील पीक वाचविण्यासाठी बागायतदारांची आतापासूनच पाण्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या बागायतदारांना यंदा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे..Grape Pruning: रोगमुक्त द्राक्षछाटणी कशी करावी?.हंगाम लांबू नये आणि पुढील काळातील पाणीटंचाईचा धोका कमी व्हावा, यासाठी शेतकरी फळछाटणी उरकण्याची घाई करत आहेत. जिल्ह्यात सुमारे ५० टक्के बागांची छाटणी झाली आहे. फुटलेल्या बागांत घडांची संख्या समाधानकारक असून, काही ठिकाणी गोळी घडांचे प्रमाण अधिक आहे; मात्र सध्या ही स्थिती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात येते..Grape Disease Management: संभाव्य वातावरणात वाढू शकतो केवडा, करपा रोगाचा धोका.घडांची स्थिती चांगली असली तरी ऑक्टोबर हीट आणि घटती पाणीपातळी यामुळे बागांच्या संगोपनाची चिंता वाढली आहे. शेततळ्यांतील पाणीसाठा जास्तीत जास्त डिसेंबरपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. जलसंपदा विभागाचे नियोजन आणि महावितरणच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या नदीकाठच्या बागांनाही पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. डिसेंबरनंतर पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे..गतवर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्षबागांची स्थिती समाधानकारक आहे. छाटणी झालेल्या बागांत घडांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, ऑक्टोबरमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाचा अभाव आणि हंगामात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता द्राक्षबागा धोक्यात आहेत.राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, द्राक्षबागायतदार संघ, सोलापूर.वाचलेला खर्च आता पाण्यावरयंदा पावसाअभावी द्राक्षबागांत रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव फारसा जाणवला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली. मात्र, आता बागा जगविण्यासाठी हाच पैसा पाण्यावर खर्च करावा लागणार आहे. द्राक्षमण्यांची फुगवण आणि काढणीच्या काळात पाण्याची गरज वाढेल. पाण्याची काटकसर आणि पर्यायी व्यवस्था करून काढणीचा हंगाम पार पडला, तरी उन्हाळ्यात किती बागा टिकतील, याची चिंता सतावत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.