Fruit Export: गतवर्षी अवकाळी पावसामुळे फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीने यंदा (२०२५-२६) उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. अपेडाकडे (कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) ३५८ उत्पादकांची नोंदणी झाली असून ७७ कंटेनरमधून एक हजार ११८ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. गतवर्षी (२०२४-२५) हीच निर्यात ६० कंटेनर व ८५३ मेट्रिक टन इतकी होती..यंदाच्या हंगामात युरोपियन देशांकडे निर्यातीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड व हॉलंड या देशांकडे ७१ कंटेनरमधून १०१६ मेट्रिक टन द्राक्षे पाठवण्यात आली, तर रशियन फेडरेशनसारख्या नॉन-युरोपियन देशात ६ कंटेनरमधून १०२ मेट्रिक टन निर्यात झाली..Grape Export: सांगली जिल्ह्यातून नऊ हजार टन द्राक्षाची निर्यात.गतवर्षी सर्व निर्यात ही केवळ युरोपियन देशांतच झाली होती; मात्र यंदा जागतिक युद्धस्थितीमुळे वाहतूक व बाजारपेठेत अडचणी निर्माण होऊनही निर्यातीत वाढ झाली, हे विशेष ठरले आहे. यंदा फळधारणा सुमारे ४० टक्क्यांनी घटली असली तरी स्थानिक बाजारात द्राक्षांचे दर टिकून राहिले असून सध्या प्रतिकिलो ६० ते ८५ रुपये दर मिळत आहेत..India Fruit Export: फळनिर्यात दहापट वाढण्याचा अंदाज.दरम्यान, राज्याच्या पातळीवर मात्र निर्यातीत घट दिसून येत आहे. २०२५-२६ मध्ये २१ एप्रिलपर्यंत ४००२ कंटेनरमधून ५६,५९९.८५७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यासाठी राज्यभरातून ३३,१२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. याउलट २०२४-२५ मध्ये ६,१६५ कंटेनरमधून ८३,१४६ मेट्रिक टन निर्यात झाली होती. यंदा सर्वाधिक निर्यात नेदरलँडला झाली असून त्यानंतर जर्मनी, युनायटेड किंग्डम, नॉर्वे, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, फिनलँड व स्वीडन या देशांचा क्रम लागतो. एकूणच, राज्यात निर्यात घटली असताना सोलापूर जिल्ह्याने वाढ नोंदवून वेगळी छाप पाडली आहे..राज्याची स्थितीवर्ष २०२५-२६ : ४००२ कंटेनर ः ५६,५९९.८५७ मेट्रिक टनवर्ष २०२४-२५ : ६,१६५ कंटेनर ः ८३,१४६ मेट्रिक टनसर्वाधिक निर्यात नेदरलँडकडेसोलापूर जिल्हा : निर्यात तुलनावर्ष २०२५-२६ : ७७ कंटेनर ः १११८ मेट्रिक टनवर्ष २०२४-२५ : ६० कंटेनर ः ८५३ मेट्रिक टनयुरोपकडे सर्वाधिक निर्यातनॉन-युरोपमध्ये रशियाकडे निर्यात.यंदाही अवकाळीच्या संकटाचा फटका बसला; मात्र त्यानंतरही निर्यातीचे वाढते आकडे हे शेतकऱ्यांनी निर्यातक्षम दर्जाचा माल तयार करण्यासाठी ‘गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस’चा वाढता अवलंब केल्याचे द्योतक आहे. जागतिक पातळीवरील युद्धस्थितीचा अडथळा नसता, तर निर्यातीत आणखी लक्षणीय वाढ दिसून आली असती.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.