Election Voting Schedule: अपात्रतेची कारवाई, मयत यासह इतर कारणास्तव रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य व थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी सध्या राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने प्रक्रिया राबविली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी (ता. २९) लागणार आहे. या पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायत सदस्य आणि ११ ठिकाणी थेट सरपंचासाठी मतदान होणार आहे. .ग्रामपंचायत सदस्याच्या २९ जागांपैकी ९ ठिकाणी उमेदवारी अर्जच प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमातीचे उमेदवार न मिळाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी-गुर्देहळ्ळी, कुसुर-खानापूर व मनगोळीतील जागा रिक्तच राहिली आहे. या प्रक्रियेत १४ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत. .Elections Voting Update: प. बंगालमध्ये पाचपर्यंत ८९, तमिळनाडूत ८२ टक्के मतदान.त्यामध्ये देवगाव राहुल मारकड, चुंब : गंगाबाई जाधव, उंबरगे : नेहा कदम (सर्व ता. बार्शी), भोसरे (ता. माढा) : कोमल बागल, मनगोळी : अंकुश खांडेकर, मंद्रूप : सुनंदा मुगळे, शंकरनगर : विकास पवार (सर्व ता. दक्षिण सोलापूर), भिलारवाडी (ता. करमाळा) : साधू पानगे, पानीव : प्रकाश गोफणे, इस्लामपूर : काजल मिसाळ (दोन्ही ता. माळशिरस), कोन्हाळी (ता. अक्कलकोट) : नागूबाई मंगरुळे, चिनके : भीमा बजबळकर, चिकमहूद : लक्ष्मी यादव, खवासपूर : लावण्या गायकवाड (सर्व ता. सांगोला) यांचा समावेश आहे..Gram Panchayat Election: नागपूर जिल्ह्यात गावपातळीवर सत्तासंग्राम पेटणार!.जनतेतून थेट सरपंच म्हणून कात्रज (ता. करमाळा) येथील कमल लकडे व रुद्देवाडी (ता. अक्कलकोट) येथील राहुल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. थेट सरपंचासाठी आता मांडेगाव (ता. बार्शी) येथे मिराबाई मिरगणे विरुद्ध शिवकन्या मिरगणे, वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कांचन खडाखडे विरुद्ध सोनाबाई खडाखडे, दर्गनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे कल्याणी चुर्तभुज विरुद्ध शिवा गायकवाड, .रिटेवाडी (ता. करमाळा) येथे केशर रिटे विरुद्ध भक्ती वलटे यांच्यात लढत होत आहे. कोळेगाव (ता. माळशिरस) येथे सुषमा दुपडे विरुद्ध सुनीता सावंत, लोंढे-मोहितेवाडी येथे उमा मोहिते विरुद्ध वनिता मोहिते, कोन्हाळी (ता. अक्कलकोट) गावात चिदानंद उण्णद यांच्या विरुद्ध मल्लिनाथ बगले सलगरमध्ये (ता. अक्कलकोट) सिदम्मा डोंगरराजे विरुद्ध रुपाली बोरगाव, यावलीमध्ये (ता. मोहोळ) सुनीता जाधव, वर्षा राऊत, अंजली राऊत यांच्यात लढत होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.