Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १२७ शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीतील नुकसानीपोटी १५१९ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. परंतु, डीबीटी, फार्मर आयडी, ई-केवायसी अशा बाबींमुळे आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांना ४०९ कोटी रुपयांचीच भरपाई मिळाली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत का मिळाली नाही?, त्याचे मूळ कारण काय?, हे आता स्वत:च्या मोबाईलवर पाहता येणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयाने त्या याद्या तलाठ्यांच्या मोबाईलवर पाठविल्या आहेत..अतिवृष्टी व सीना नदीचा पूर, सततचा पाऊस यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला. राज्य सरकारने तातडीने पंचनामे अहवाल मागवून मदतीची रक्कमदेखील वितरित केली. तरीपण, अजूनही जिल्ह्यातील चार लाख २६ हजार ७८ शेतकऱ्यांची १११० कोटींची भरपाई प्रलंबित आहे. .Farmer Relief Fund: अहिल्यानगर जिल्ह्यात पावणेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटीची मदत जमा.गावातील शेजारील शेतकऱ्याला किंवा घरातील एका सदस्यास मदतीची रक्कम आली की दुसरा शेतकरी तलाठ्यांना थेट फोन लावत आहे. दररोज शेकडो फोन तलाठ्यांना घ्यावे लागत आहेत. काहीजण तहसीलदारांनाही संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या मदतीची सद्य:स्थिती स्वत:च्या मोबाईलवर पाहता यावी म्हणून मंडलनिहाय ऑनलाइन याद्या काढण्यात आल्या आहेत..त्यावर शेतकऱ्यांचा ‘व्हीके’ क्रमांक टाकून सर्च केल्यास त्या शेतकऱ्याला भरपाई का मिळाली नाही? याचे उत्तर मिळणार आहे. त्याठिकाणी बॅंक खाते क्रमांक, मदतीची रक्कम व प्रलंबित राहण्याचे नेमके कारण देखील पाहता येणार आहे..Gujarat Farmer Relief Package: गुजरातमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री पटेल यांची घोषणा.‘या’ संकेतस्थळावर पाहा नुकसानभरपाईची माहितीशेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झालीआहे हे पाहण्यासाठी https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus येथे क्लिक करावे. त्यावर आपला ‘व्हीके’ आयडी तथा क्रमांक टाकल्यास आपल्याला नुकसान भरपाई किती मिळाली, का मिळाली नाही, कोणत्या बॅंक खात्यात जमा झाली हे पाहता येणार आहे..नुकसान भरपाईची सद्य:स्थितीएकूण बाधित शेतकरी ७,६४,१७३भरपाईची एकूण रक्कम ८६७.३७ कोटीरब्बी मशागत-पेरणीची मदत ६५२ कोटीभरपाई मिळालेले शेतकरी ३,४१,०९५भरपाईपोटी मिळालेली रक्कम ४०९कोटी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.