Farmer Protest: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील ‘गोकूळ साखर कारखान्या’कडे थकलेल्या ऊसबिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १४ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करूनही प्रशासनाने आणि कारखान्याने दखल न घेतल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. येत्या बुधवारी (ता. १०) विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलावात (कंबर तलाव) सामूहिक ‘जलसमाधी’ घेणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. .गोकूळ कारखान्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. हक्काच्या पैशांसाठी दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन आठवड्यांपासून उन्हातान्हात आंदोलन करत आहेत. मात्र, अद्यापही तोडगा निघालेला नाही. .Sugarcane Payments Pending: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन.कारखान्याच्या या आडमुठ्या धोरणामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी निघणाऱ्या या मोर्चात सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. आता जिल्हाधिकारी आणि कारखाना प्रशासन यावर काय तोडगा काढणार आणि बुधवारी होणारे हे तीव्र आंदोलन रोखण्यात प्रशासनाला यश येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..Sugarcane Payments Pending: थकीत एफआरपी न दिल्यास आंदोलन करणार : राजू शेट्टी ....असे असेल आंदोलन‘‘शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार, आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार पूनम गेट येथून मोर्चाने शेतकरी संभाजी तलावाकडे निघतील. पूनम गेट ते सात रस्ता, तिथून नवीन जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे पोहोचल्यानंतर, थकीत बिलांचा निर्णय न झाल्यास सर्व शेतकरी थेट तलावात जलसमाधी आंदोलन करतील. .या दरम्यान होणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित घटनेला कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील.’’ असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.