मोकळ्या शेतातील मातीविना शेती ही एक पीक लागवडीची आधुनिक पद्धत आहे. शेतजमिनीत किंवा थेट मातीत पीक लागवड न करता प्लॅस्टिकच्या ट्रफ बेडमध्ये पिकांची लागवड केली जाते. .या पद्धतीत कोकोपीट हे लागवडीचे माध्यम म्हणून वापरले जाते. हे हलके, स्वच्छ व उत्तम जलधारण क्षमतेचे असते..Hydroponics Farming : Is soilless farming profitable?| Agrowon.स्ट्रॉबेरी, खाद्य फुले, सेलरी आणि लीक यांसारखी उच्च मूल्य असणारी पिके या पद्धतीत अधिक यशस्वीपणे घेतली जातात.ट्रफ बेड जमिनीपासून उंचावर असल्यामुळे मातीजन्य रोग, कीड व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.पाणी, खतांचे अचूक व्यवस्थापन करता येत असल्याने उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादनाची गुणवत्ता वाढते.पारंपरिक शेतीच्या तुलनेत या पद्धतीत पाण्याची ५० ते ६० टक्क्यांपर्यंत बचत होते..मोकळ्या जागेमध्ये आणि खडकाळ, नापीक जमिनीतही ही नवीन पीक लागवड पद्धत वापरता येत असल्यामुळे पॉलिहाउसशिवाय कमी खर्चात आधुनिक शेती शक्य होते.पिकांची वाढ एकसमान होत असल्याने उत्पादन अधिक, आकार व रंग आकर्षक मिळतो. यामुळे बाजारपेठेत चांगला दर मिळतो.मजुरांचे श्रम कमी होऊन काढणी, देखभाल व व्यवस्थापन सुलभ होते.तंत्रज्ञानाधारित शेती पद्धत निर्यातक्षम, सुरक्षित व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरते, उत्पन्न वाढवण्यास मदत करते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.